खासदार नवनीत राणा अखेर मोदींना भेटल्याच 

खासदार नवनीत राणा अखेर मोदींना भेटल्याच 

नागपूर ः राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर खासदार झालेल्या नवनीत राणा अखेर पंतप्रधान मोदींना भेटल्या. या भेटीला निमित्त होते चिखलदऱ्याला पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याचे आणि अमरावती जिल्ह्याच्या विकासाचे. 

राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर खासदार झालेल्या नवनीत राणा भाजपच्या गोटात जाणार का ? अशी चर्चा राजकीय वर्तुळात आधीच रंगली आहे. या पार्श्‍वभूमीवर खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा या दोघांनी पंतप्रधान कार्यालयात जाऊन नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी अमरावती जिल्ह्याचे विभाजन करून अचलपूर जिल्ह्याची स्वतंत्र निर्मिती करावी अशी प्रमुख मागणी त्यांनी केली.

 याशिवाय शेतकऱ्यांच्या शेतमालाची थेट खरेदी करावी, शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी. विदर्भातील बंद पडलेले सिंचन प्रकल्प लवकर सुरू करावेत. अमरावती येथील बेलोरा विमानतळ तातडीने सुरू करावे आदी मागण्या त्यांनी केल्या. अमरावती जिल्ह्याच्या बारा विषयांवर ही चर्चा झाली. सुमारे पाऊण तास चाललेल्या या भेटीत राजकीय चर्चा काय झाली? याबाबत मात्र नवनीत राणा यांनी कुठलीही वाच्यता केलेले नाही. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com