हसन मुश्रीफ हे मोदींपेक्षा काकणभर पुढेच!

जिल्हा बॅंकेत संचालक मंडळ आल्यानंतर अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी केलेल्या आवाहनानुसार संचालक मंडळ निरपेक्षपणे आणि निपक्षपातीपणे या बॅंकेच्या विकासासाठी एक दिलाने झटत आहे. त्यामुळेच बॅंक आज प्रगतीपथावर आल्याचे दिसते.
हसन मुश्रीफ हे मोदींपेक्षा काकणभर पुढेच!

कोल्हापूर : "सबका साथ, सबका विकास' या भावनेने काम करण्यात आमदार श्री हसन मुश्रीफ हे पंतप्रधान मोदींच्याही काकणभर पुढेच आहेत, असे प्रतिपादन नूतन खासदार संजय मंडलिक यांनी केले. 

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्याबद्दल मंडलिक यांचा आज जिल्हा बॅंकेत संचालक मंडळाच्या बैठकीत श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मंडलिक बोलत होते. माझ्या खासदारकित जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या संचालक मंडळापासून अधिकारी, कर्मचारी व अगदी शिपायापर्यंत सर्वांचे योगदान मोठे आहे, असेही मंडलिक यावेळी म्हणाले. 

मंडलिक म्हणाले,"ही बॅंक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासाची मुख्य वाहिनी आहे. बॅंकेने शेतकऱ्यांसाठी अपात्र कर्जमाफीची लढलेली लढाई अंतिम टप्प्यात आली आहे. लवकरच न्यायालयीन निकाल लागेल. परंतु केंद्र सरकारच्या पातळीवर आवश्‍यक ते प्रयत्नही करु. प्रशासकांची कारकीर्द संपून चार वर्षांपूर्वी आमचे संचालक मंडळ या बॅंकेत सत्ताधारी झाले. त्या वेळी सर्वच पातळ्यांवर बॅंक अत्यंत अडचणीत आली होती. श्री. मुश्रीफ यांनी गटातटाच्या पलीकडे जाऊन शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी तळमळीने काम करण्याचे आवाहन संचालक मंडळाला केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत त्यांच्या नेतृत्वाखाली गेली चार वर्षे सर्वच पातळीवर बॅंकेने भरारी घेतली आहे.'  

आपल्या भाषणात प्रा. मंडलिक यांनी माजी खासदार कै. सदाशिवराव मंडलिक व श्रीमती निवेदीता माने यांचा संदर्भ देत हे लोक पहिल्यांदा खासदार झाले आणि नंतर बॅंकेचे संचालक झाले. मला मात्र या बॅंकेचे संचालक झाल्यानंतर खासदारकी मिळाली असे सांगितले.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com