खासदार जलीलही नाराज, त्या पत्रिकेवर नाव नाही !

.
Imtiaj_Jaleel
Imtiaj_Jaleel

औरंगाबाद : "प्रोटोकॉलप्रमाणे जिथे पंतप्रधान, मुख्यमंत्री, राष्ट्रपती अशा महत्त्वाच्या व्यक्तींच्या उपस्थितीत कार्यक्रम असतो, त्याठिकाणी स्थानिक खासदारांना बोलवायला हवं. स्थानिक खासदारांचं निमंत्रण पत्रिकेत नाव असायला हवं. मात्र शनिवारी होणाऱ्या डीएमआयसीतील ऑरिक इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रम पत्रिकेत नाव न टाकता स्थानिक नेत्यांनी 'चिप मेंटॅलीटी' दाखवून दिली आहे,'' अशी प्रतिक्रिया एमआयएमचे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी दिली आहे. 

औरंगाबादच्या शेंद्रा परिसरातील औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटीच्या (ऑरिक) पहिल्या टप्प्याचा राष्ट्रार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या होणार आहे. त्यासोबत ऑरिक हॉल, त्यामधील कमांड कंट्रोल सेंटर, रस्त्यांसह अन्य सुविधांचे जाळे आणि इ- लॅंड मॅनेजमेंट सिस्टिमचे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाला जोडूनच राज्याच्या ग्रामविकास व पंचायतराज विभागाच्यावतीने सक्षम महिला मेळावा होणार आहे.

 या भव्यदिव्य कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, रावसाहेब दानवे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे, पालकमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, महिला व बालकल्याण राज्यमंत्री श्रीमती विद्या ठाकूर, ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे, उद्योग राज्यमंत्री अतुल सावे, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्ष श्रीमती ज्योती ठाकरे यांची उपस्थिती राहणार आहेत .

 या सर्वांची नावे त्या निमंत्रण पत्रिकेत छापण्यात आली आहेत. मात्र, औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांचे नाव निमंत्रण पत्रिकेत छापले नसल्याने जलील हे संतापले आहेत. 

यावर 'साम टीव्ही'शी बोलताना खासदार जलील म्हणाले, "निमंत्रण पत्रिकेमध्ये स्थानिक खासदाराला वगळणे हे निंदनीय आहे. मागच्या वीस-पंचवीस वर्षापासून एकदा तरी मला दाखवा, की जिथे पंतप्रधान, मुख्यमंत्री, राष्ट्रपती असतात, त्याठिकाणी प्रोटोकॉलप्रमाणे स्थानिक खासदाराला बोलावलेच पाहिजे. तुम्ही 'इग्नोर' करताय,ही तुमची चीफ मेंटॅलिटी दिसते. उद्या पंतप्रधान,मुख्यमंत्री येणार आहेत. आम्ही त्यांचा विरोध करणार आहोत. काळे झेंडे दाखवणार आहोत. कार्यक्रमस्थळी जाऊन पंतप्रधानाना सांगणार आहोत की, तुमचे स्थानिक लोक कसे चीपप्रमाणे वागतात."

ना निमंत्रण पत्रिकेवर नाव ना व्यासपीठावर स्थान , डोणगांवकर नाराज

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com