खासदार इम्तियाज जलील हरवले आहेत !

..
Imtiaz-Jaleel.
Imtiaz-Jaleel.

वैजापूर:  जिल्ह्याचे खासदार इम्तियाज जलील हे हरविले असून वैजापूर तालुक्‍यात गोदेच्या पुरासह परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले असताना जलील तालुक्‍यात फिरकले नाहीत. त्यामुळे तालुक्‍यातील जनतेच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याची मागणी चक्क जिल्हाधिकार्यांकडे निवेदनाद्वारे रियाञोद्दीन शेख यांनी केली आहे.

यासंदर्भात जिल्हाधिकार्यांना रियाञोद्दीन शेख यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, लोकसभा निवडणूक होऊन तब्बल पाच महिन्यांचा कालावधी उलटला. परंतु खासदार इम्तियाज जलील हे नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी वैजापूर विधानसभा मतदारसंघात एकदाही फिरकले नाहीत. त्यामुळे जलील यांना मतदारसंघाचा विसर पडला की काय? अशी परिस्थिती आहे. 


दोन महिन्यांपूर्वी गोदावरी नदीला पूर येऊन गोदाकाठच्या 17 गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून पिके उध्वस्त झाली. याशिवाय बहुतांश गावांचा संपर्कही तुटला होता. पूरपरिस्थिती उद्भवल्यामुळे गोदाकाठच्या गावांमध्ये अन्नधान्यासह आरोग्य, वीज व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवला होता. त्यामुळे मदतकार्यासाठी विविध राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींसह पदाधिकारी, सेवाभावी संस्था व प्रशासकीय यंत्रणा राञंदिवस कार्यरत होती. 

गोदेच्या पुराने नागरिकांना वेढलेले असतानाही जलील यांनी मतदारसंघात येण्याची तसदी घेतली नाही. गेल्या काही दिवसांपासून तालुक्‍यात परतीच्या पावसाने पिकांचे नुकसान झाल्यामुळे हाहाकार माजला आहे.

झालेल्या नुकसानीची भरपाई मिळवून देण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींसह कार्यकर्ते पीक पाहणी दौरे करीत आहेत. तालुक्‍यात आलेला पूर व परतीच्या पावसामुळे झालेले पिकांचे प्रचंड नुकसान पाहता जलील यांनी मतदारसंघातील आपदग्रस्त नागरिकांना धीर देणे आवश्‍यक असताना त्यांनी पाठ फिरवली. 

मतदारसंघातील तब्बल 35 हजार मतदारांनी जलील यांच्या पारडयात मते टाकलेली आहेत. त्यामुळे जलील यांनी मतदारसंघात येऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेणे त्यांचे आद्यकर्तव्य आहे. परंतु ते औरंगाबाद शहरातील समस्या सोडविण्यातच व्यस्त आहे. मी स्वतः जलील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे मतदारसंघातील जनतेच्या भावना जलील यांच्यापर्यंत पोहचवाव्यात. असे आर्जव रियाञोद्दीन शेख यांनी जिल्हाधिकार्यांकडे दिलेल्या निवेदनात केले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com