राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून खासदार पाटील यांची प्रशंसा

खासदार हेमंत पाटील यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची नुकचीत भेट घेतली. हिंगोली जिल्ह्यात आदिवासी समाज मोठ्या संख्येने आहे. त्यामुळे फॉरेस्ट राईट ऍक्‍ट आणि बायोडायवरसिटी कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी व आदिवासींसाठीच्या पेसा ऍक्‍ट मार्फत सर्वांगीण विकासाची श्वेतपत्रिका तयार करण्याबाबत उभयतांमध्ये चर्चा झाली. आपल्या मतदारसंघासाठी करीत असलेल्या कार्याबद्दल राष्ट्रपतींनी खासदार पाटील यांची प्रशंसा केली. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी व गोदावरी समूहाच्या अध्यक्ष राजश्री पाटील आणि रुद्र पाटील होते.
mp hemant patil meets president kovind
mp hemant patil meets president kovind

यवतमाळ : खासदार हेमंत पाटील यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची नुकचीत भेट घेतली. हिंगोली जिल्ह्यात आदिवासी समाज मोठ्या संख्येने आहे. त्यामुळे फॉरेस्ट राईट ऍक्‍ट आणि बायोडायवरसिटी कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी व आदिवासींसाठीच्या पेसा ऍक्‍ट मार्फत सर्वांगीण विकासाची श्वेतपत्रिका तयार करण्याबाबत उभयतांमध्ये चर्चा झाली. आपल्या मतदारसंघासाठी करीत असलेल्या कार्याबद्दल राष्ट्रपतींनी खासदार पाटील यांची प्रशंसा केली. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी व गोदावरी समूहाच्या अध्यक्ष राजश्री पाटील आणि रुद्र पाटील होते.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या अत्यंत व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून खासदार हेमंत पाटील यांना वेळ दिली. खासदार पाटील म्हणाले, हिंगोली जिल्ह्यात आदिवासी समाज मोठ्या संख्येने आहे. त्यामुळे फॉरेस्ट राईट ऍक्‍ट आणि बायोडायवरसिटी कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी. आदिवासीसाठीच्या पेसा ऍक्‍ट मार्फत सर्वांगीण विकासाची श्वेतपत्रिका तयार करण्यात यावी व याबाबत केंद्र आणि राज्य सरकारने लक्ष देणे गरजेचे आहे. सोबतच हिंगोली हा शेती आणि सिंचनाच्या बाबतीत सुद्धा मागासलेला जिल्हा असून सिंचनाच्या सर्व सुविधा हिंगोली जवळील इतर भागांना मिळतात. त्यामुळे मतदार संघ बागायती क्षेत्राच्या बाबतीत मागासलेला आहे. सिंचनाच्या सुविधा नसल्यामुळे याचा थेट परिणाम मतदार संघाच्या मानव विकास निर्देशांकावर होत असल्याची बाब खासदार हेमंत पाटील यांनी स्पष्ट केली. तसेच रेल्वे, उद्योग व ग्रामीण विकासातही जिल्हा आणि मतदार संघ पिछाडीवर असल्याचे खासदार हेमंत पाटील यांनी नमूद केले. 

खासदार पाटील यांनी अधिवेशनात आजवर मतदार संघाच्या विकासासाठी अनेक प्रश्न उपस्थित करून मागण्या मांडल्या आहेत. या कार्याची दखल घेऊन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांची प्रशंसा केली. आजवर त्यानी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शिष्टमंडळासमवेत तर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, वस्त्रोउद्योग मंत्री स्मृती ईराणी, केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांची भेट घेऊन प्रश्न मांडले आहेत. तर मतदार संघातून येणाऱ्या शिष्टमंडळाना विविध मंत्री आणि मंत्रालय यांची भेट घडवून मतदार संघाच्या प्रश्नांना प्राधान्य दिले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com