इलेक्‍ट्रीकल टेस्टींग लॅबच्या श्रेयवादात खासदार गोडसेंकडून समीर भुजबळांचा अनुल्लेख!

थील शिलापूर शिवारात हा कार्यक्रम झाला. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय उर्जामंत्री आर. के. सिंग, राज्याचे उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री बबनराव घोलप, खासदार हेमंत गोडसे, आमदार योगेश घोलप, आमदार राजाभाऊ वाजे आदींसह माजी खासदार समीर भुजबळ व्यासपीठावर होते. यावेळी सुत्रसंचालकांनी व्यासपीठावरील प्रत्येकाचे नाव घेतले. मात्र, माजी खासदार भुजबळ यांचा त्यांना विसर पडला.
Samir Bhujbal - Hemant Godse
Samir Bhujbal - Hemant Godse

नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर  येथे इलेक्‍ट्रीक टेस्टींग लॅबचे भुमीपुजन केंद्रीय उर्जामंत्री आर. के. सिग यांच्या हस्ते झाले. 2013 मध्ये मंजुर झालेल्या या लॅबसाठी दोन दिवसांपासून शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांत श्रेयवादाची लढाई सुरु होती. त्याचा परिणाम म्हणजे शिवसेना भाजप नेत्यांसह खासदार हेमंत गोडसे यांनीही व्यासपीठावरील माजी खासदार समीर भुजबळ यांचा उल्लेख केला नाही. सुत्रसंचालकांसह सर्वच नेते कार्यक्रमाला हजर नसलेल्या आमदार पंकज भुजबळांचे नाव घेत होते.

येथील शिलापूर शिवारात हा कार्यक्रम झाला. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय उर्जामंत्री आर. के. सिंग, राज्याचे उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री बबनराव घोलप, खासदार हेमंत गोडसे, आमदार योगेश घोलप, आमदार राजाभाऊ वाजे आदींसह माजी खासदार समीर भुजबळ व्यासपीठावर होते. यावेळी सुत्रसंचालकांनी व्यासपीठावरील प्रत्येकाचे नाव घेतले. मात्र, माजी खासदार भुजबळ यांचा त्यांना विसर पडला. मात्र कार्यक्रमाला उपस्थित नसलेल्या आमदार पंकज भुजबळ यांचा त्यांनी नामोल्लेख केला. भाषण करणाऱ्या विविध नेत्यांनीही तीच री ओढली. अगदी खासदार गोडसे यांनीही समीर भुजबळ यांचा अनुल्लेख केला. त्यामुळे इलेक्‍ट्रीकल टेस्टींग लॅबच्या श्रेयवादाचा दावा शिवसेनेला चांगलाच झोंबल्याचे जाणवले.

दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी इलेक्‍ट्रीकल लॅबला २०१२ मध्ये निर्णय झाला. २०१३ मध्ये तत्कालीन पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या पुढाकाराने शिलापूर भागातील दिडशे एकर जागा हस्तातंरीत करण्यात आली. त्यासाठी तत्कालीन खासदार समीर भुजबळ यांनी पाठपुरावा केला होता. त्यामुळे भुमीपूजन झाले तरी त्याचे श्रेय शिवसेनेला मिळेल की नाही, याचीच चर्चा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com