M.P. Gayakwad angry again ! | Sarkarnama

खासदार रविंद्र गायकवाड पुन्हा संतापले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 एप्रिल 2017

औरंगाबाद : एअर इंडिया फेम शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड लातूर शहरात मंगळवारी  सर्व ए . टी . एम . वर  खडखडाट असल्याने  भडकले होते . रागाच्या भरात  त्यांची  पोलीस आणि बँक अधिकाऱ्यांशी वादावादी देखील झाली . खासदार भडकल्यावर काय होऊ शकते याचा अंदाज असल्याने बँक अधिकाऱ्यांनी त्यांना कॅश उपलबध करून देऊन पुढील अनर्थ टाळला . 

 

औरंगाबाद : एअर इंडिया फेम शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड लातूर शहरात मंगळवारी  सर्व ए . टी . एम . वर  खडखडाट असल्याने  भडकले होते . रागाच्या भरात  त्यांची  पोलीस आणि बँक अधिकाऱ्यांशी वादावादी देखील झाली . खासदार भडकल्यावर काय होऊ शकते याचा अंदाज असल्याने बँक अधिकाऱ्यांनी त्यांना कॅश उपलबध करून देऊन पुढील अनर्थ टाळला . 

 

लातूर महापालिकेतील शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी रविंद्र गायकवाडसोमवारीच लातूरात दाखल झाले होते. प्रचाराचा शेवटचा दिवस असल्यानेत्यांनी प्रचारात सहभाग घेतला आणि लातूरातच मुक्काम केला. मंगळवारी(ता.18) सकाळी त्यांनी पीएला पाठवून एटीएममधून पैसे काढून आणण्यास
सांगतिले. शहरातील पाच-सहा एटीएमवर जाऊन आल्यावरहीपैसे मिळाले नसल्याचेत्याने गायकवाडांना सांगितले आणि त्यांचा पारा चढला. रागाच्या भरात ते स्वता पीए सोबत बसस्टॅंड जवळीलचंद्रनगर येथील  एसबीआय बॅंकेच्या एटीएमवर गेले. मात्र त्याही एटीएममध्येखडखडाट होता. हे पाहून खासदारांना राग अनावर झाला  आणि त्यांना स्थानिक शिवसैनिकांनाबोलावून एटीएमसमोरच आंदोलन सुरु केले. घोषणाबाजी आणि आंदोलनामुळे हापरिसर शिवसैनिकांनी दणाणून सोडला.

खासदारच एटीएम समोर आंदोलन करतअसल्याचे बॅंकेच्या अधिकाऱ्यांना कळताच ते धावत पळतच घटनास्थळी आले.त्यांनी गायकवाडांची समजुत काढण्याचा प्रयत्न केला, पण ते ऐकण्याच्यामनस्थितीत नव्हते. एव्हाना पोलीसही दाखल झाले होते. यावेळी गायकवाडांचीपोलीसांशी देखील हुज्जत झाल्याचे कळते. प्रकरण अधिकच तापणार याचा अंदाजआल्याने बॅंकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ कॅशची व्यवस्था केली आणिगायकवाड साहेबांनी दिली. तसेच एटीएममध्येही कॅश भरली. बऱ्याच गोंधळानंतरखासदार गायकवाड व शिवसैनिक तिथून निघून गेले. 

तब्बल महिनाभरानंतर  कुठलाही गाजावाजा न करता पुण्याहून उमरग्यात दाखल झालेल्यागायकवांडानी शनिवारी येरमाळा येथील यात्रेत सहकुटुंब हजेरी लावूनयेडेश्‍वरी देवीचे दर्शन घेतले. दुसऱ्या दिवशी उस्मानाबादेतील नाट्यसंमेलनाच्या उद्घाटनाला देखील त्यांनी हजेरी लावली. सोमवारी (ता.17)गायकवाड लातूर महापालिकेतील शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी लातूरला
रवाना झाले होते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख