mp gaikawad | Sarkarnama

खासदार गायकवाडांच्या समर्थनार्थ उमरग्यात बंद

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 27 मार्च 2017

उस्मानाबाद ः शिवसेनेचे खासदार प्रा. रवींद्र गायकवाड यांच्यावर एअर इंडियासह इतर विमान कंपन्यांनी घातलेल्या प्रवास बंदीच्या विरोधात व खासदारांच्या समर्थनार्थ शिवसेनेने उमरगा व लोहारा या दोन तालुक्‍यामध्ये बंद पुकारला होता. या बंदला व्यापाऱ्यांनी पाठिंबा दिल्यामुळे उमरगा, लोहाऱ्यातील बाजारपेठा बंद होत्या. दरम्यान, लोहारा येथे रस्त्यावर उतरलेल्या शिवसैनिकांनी एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळत संताप व्यक्त केला. 

पुणे-दिल्ली प्रवासा दरम्यान एअर इंडियाच्या विमानात खासदार रवींद्र गायकवाड व विमान अधिकाऱ्यांमध्ये वादावादी झाली होती. गायकवाड यांनी संबंधित अधिकाऱ्याला सॅन्डलने मारहाण केल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. या मारहाणीच्या निषेधार्थ एअर इंडियाने त्यांचे परतीचे तिकीट रद्द करुन ब्लॅकलिस्ट मध्ये टाकले होते.

या प्रकरणाचे पडसाद संसदेत देखील उमटले होते. खासदार गायकवाड यांची ही कृती योग्य ठरवत शिवसेनेने एअर इंडियासह इतर विमान कंपन्यांनी केलेली प्रवास बंदी अयोग्य असल्याचे म्हणत त्याच्या निषेधार्थ आज (ता.27) उमरगा व लोहारा तालुका बंदची हाक दिली होती. या बंदला शहरी व ग्रामीण भागात देखील चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. बंद दरम्यान आक्रमक झालेले शिवसैनिक रस्त्यावर उतरले होते. लोहारा येथे शिवसैनिकांनी एअर इंडियाच्या अधिकाऱ्याचा पुतळा जाळला, तर गायकवाड यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी शहरातून मोटारसायकल रॅली देखील काढण्यात आली. 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख