मुलगा-सुनेचा पराभव केलेल्या शिवसेनेचे 'महापौरपद' गांधी घालविणार?

गाजावाजा न करताही शिवसेनेने शर्य़त जिंकली.
मुलगा-सुनेचा पराभव केलेल्या शिवसेनेचे 'महापौरपद' गांधी घालविणार?

नगर : भाजपचे खासदार दिलीप गांधी यांनी ताकद पणाला लावूनही पूत्र सुवेंद्र व स्नुषा दीप्ती यांना पराभव केवळ शिवसेनेमुळे स्विकारावा लागला. त्यामुळे आता शिवसेनेशी युती नकोच, त्यापेक्षा राष्ट्रवादीसोबत राहून सत्तेत सहभागी होण्याची तयारी खासदार दिलीप गांधी यांच्या गोटातून असल्याचे समजते. 

खासदार दिलीप गांधी यांचे पूत्र सुवेंद्र व स्नुषा दीप्ती गांधी यांचा पराभव खासदार गांधी गटाच्या जिव्हारी लागला आहे. सर्वच्या सर्व जागा जिंकण्याचे स्वप्न भाजप नेत्यांनी पाहिले होते. त्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांची सभा भरवून तीनशे कोटी देण्याचे सुतोवाच केले होते. मात्र नगरकरांनी हवा तेवढा प्रतिसाद दिला नाही. गाजावाजा न करताही शिवसेनेने शर्य़त जिंकली.  

शिवसेनेला २४, राष्ट्रवादीला १८, भाजपला १४, काँग्रेस ५, बहुजन समाज पक्ष ४, तर अपक्ष २ व समाजवादी पक्ष १ अशा जागा मिळाल्या. शिवसेना सर्वात मोठा पक्ष ठरला. त्यामुळे महापौरपदासाठी शिवसेनेने तयारी केली आहे. असे असले, तरी कोणत्या तरी पक्षाची कुबडी घेतल्याशिवाय सत्ता स्थापन करता येणे शक्य नाही, त्यामुळे भाजपशी युती करण्यासाठी शिवसेनेची तयारी असल्याचे समजते.  

दरम्यान, खासदारांच्या घरातील दोन सदस्यांचा झालेला पराभव शिवसेनेमुळेच झाला आहे. हा राग मनात धरून शिवसेनेशी युती नकोच, असाच सूर गांधी गटाकडून येवू लागला आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com