अकोल्यात गरब्याच्या तालावर थिरकल्या खासदारांच्या 'होम मिनीस्टर' - MP Dhotre Wife Garba Dance | Politics Marathi News - Sarkarnama

अकोल्यात गरब्याच्या तालावर थिरकल्या खासदारांच्या 'होम मिनीस्टर'

श्रीकांत पाचकवडे
मंगळवार, 26 सप्टेंबर 2017

आदिशक्ती नवदुर्गा उत्सवाला अकोल्यात हर्षोउल्हासात सुरूवात झाली आहे. या उत्सवात ढोल आणि नगाड्यांच्‍या तालावर युवक, युवती आणि महिला अगदी बेधूंद नृत्‍य सादर करीत असताना खासदार संजय धोत्रे यांच्या सुविद्य पत्नी सुहासिनीताई धोत्रे यांना गरब्याचा मोह आवरता आला नाही. महिलांसोबत त्यांनी गरबा खेळत अकोलेकरांच्या उत्साहात भर टाकली.

अकोला : आदिशक्ती नवदुर्गा उत्सवाला अकोल्यात हर्षोउल्हासात सुरूवात झाली आहे. या उत्सवात ढोल आणि नगाड्यांच्‍या तालावर युवक, युवती आणि महिला अगदी बेधूंद नृत्‍य सादर करीत असताना खासदार संजय धोत्रे यांच्या सुविद्य पत्नी सुहासिनीताई धोत्रे यांना गरब्याचा मोह आवरता आला नाही. महिलांसोबत त्यांनी गरबा खेळत अकोलेकरांच्या उत्साहात भर टाकली.

नारीशक्तीसाठी सर्वांत लोकप्रिय सण म्‍हणजे नवरात्री. मोठ्या झगमगाटात आणि उत्‍साहात 'रास दांडिया महोत्‍सव' सर्वत्र साजरा केला जातो. अकोला शहरातही अनेक नवदुर्गा उत्सव मंडळ रास दांडिया महोत्सवाचे मोठ्या धुमधडाक्यात आयोजन करीत असतात. येथील मुंगीलाल बाजोरिया प्रांगणात आयोजित गरबा महोत्सवाला सोमवारी (ता. 25 ) खासदार संजय धोत्रे यांच्या पत्नी सुहासिनीताई धोत्रे, माजी महापौर सुमनताई गावंडे, महापालिकेच्या महिला व बालकल्याण सभापती सारिका जयस्वाल, सोनल ठक्कर आदींनी भेट दिली. यावेळी सुहासिनीताई यांच्या हस्ते नवदुर्गेची पुजा करण्यात आली. त्यानंतर ढोल आणि नगाऱ्याच्‍या तालावर सुरू झालेल्या गरबा महोत्सवात युवती, महिला अगदी नृत्‍य करीत होत्या.

महिलांमधील हा उत्साह पाहुन सुहासिनीताईं यांनाही गरबा डान्सचा मोह आवरता आला नाही. आणि आपसुकच त्यांची पावले गरबा खेळणाऱ्या महिलांकडे वळली. रंगीबेरंगी पोशाखात नटलेली तरूणाई गरबा खेळण्‍यात तल्‍लीन झाले होते. त्यांच्या उत्साहात सहभागी होत खासदारांच्या होम मिनीस्टर असलेल्या सुहासिनीताई यांनी अकोलेकरांच्या आनंदात भर टाकली.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख