पूरबाधित ऊस पहिल्यांदा तोडा अन्यथा आंदोलन : धैर्यशील माने

गळीत हंगाम सुरू झाल्यानंतर पंधरा दिवसांत पूरबाधित क्षेत्रातील उसाची तोड झाली तरच शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा मिळेल. त्या दृष्टीने तातडीची बैठक बोलवावी अन्यथा कारखानदारांच्या विरोधात आंदोलन छेडण्याचा इशाराही शिष्टमंडळाने दिला.
dhairysheel-mane-
dhairysheel-mane-

कोल्हापूर   :  महापुरानंतर ऑक्‍टोबर अखेरचा पाऊस यामुळे शेतकरी आर्थिक आणि मानसिकदृष्टया पूर्णपणे खचला आहे. यंदा ऊसाचा गळीत हंगाम सुरू झाल्यानंतर पूरबाधित क्षेत्रातील ऊसाची तोड करण्यास प्राधान्य द्यावे, अशी मागणी खासदार धैर्यशील माने यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.

जिल्हाप्रमूख मुरलीधर जाधव, मधुकर पाटील, नामदेव गिरी, साताप्पा भवन, दत्ता पवार,आनंद शेट्टी, बाजीराव पाटील, रविंद्र माने, रविंद्र लोहार, भाऊसाहेब आवळे, महेश बोहरा, आण्णासाहेब बिलुरे आदिंच्या निवेदनावर स्वाक्षरी आहेत. खासदार माने यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याशी चर्चा केली.

 त्यांनी सर्व साखर कारखान्यांचे अध्यक्ष तसेच कार्यकारी संचालक यांची बैठक घेऊन पूरबाधित क्षेत्रातील ऊसाची लेखी हमी घ्यावी अशी मागणी केली. मागील हंगामातील अंतिम दर, तसेच चालू हंगामातील ऊस दर जाहीर करूनच हंगाम सुरू करण्यास प्राधान्य द्यावे अशी मागणी त्यांनी केली. जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून हेक्‍टरी पंचवीस हजारांची मदत करावी. महापूरामुळे झालेल्या नुकमानीची कृषि विभाग तसेच महसूल विभागाकडून तात्काळ पंचनामे करावेत अशी मागणी त्यांनी केली.

जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे. ऑगस्ट, सप्टेबरमधील महापूर ऑक्‍टोबर अखेरचा पाऊस यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शेकडो गावे आणि हजारो हेक्‍टर जमीन पाण्याखाली गेली. ऊसासह, सोयाबीन, भात, पिके पाण्यात होती.पिकांचे नुकसान झाले. पिकासह ज्यांच्या घरांची पडझड झाली त्यांना नुकसानभरपाई मिळालेली नाही.



 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com