खासदार भारती पवार  कांदा लागवडीसाठी सरसावल्या 

खासदार पवार कळवण तालुक्यात दौरा करीत होत्या. त्यांचे गाव याच तालुक्यातील आहे. गोपाळखडी येथे महाले यांच्या शेतात कांदा लागवड सुरु होती. खासदार पवार यांनी या महिलांशी पिकपाण्याबाबत विचारपुस केली.
MP-Pawar-onion-
MP-Pawar-onion-

नाशिक  : कांदा दर कोसळला काय किंवा वधारला काय खासदारांना त्यासाठी दिल्लीत भांडावे लागते. खासदार डाॅ भारती पवार यांचा मतदारसंघ तर कांदा उत्पादकांचाच मतदारसंघ. काल मतदारसंघाच्या दौरा करीत होत्या. शेतक-यांची विचारपुस करताना त्यांनी महिलांसोबत शेतात थेट कांदा लागवडच केली.  त्याची सबंध मतदारसंघात चर्चा आहे.

खासदार पवार कळवण तालुक्यात दौरा करीत होत्या. त्यांचे गाव याच तालुक्यातील आहे. गोपाळखडी येथे महाले यांच्या शेतात कांदा लागवड सुरु होती. खासदार पवार यांनी या महिलांशी पिकपाण्याबाबत विचारपुस केली. या महिलांनी शेतातील काम न थांबवताच कांदा लागवड आणि दराबाबत तक्रारी केल्या. 


यावर बोलक्या स्वभावाच्या भारती पवार यांनीही कमरेला पदर खोचला आणि त्या आदिवासी महिलांसोबत कांदा लावणीची करू लागल्या. त्यांचा उत्साह पाहून शेतातील महिलांनाही हुरूप आला. मग त्या कांदा लागवड करता करता पिकपाण्याच्या गप्पांत रंगल्या. खासदारांच्या कांदा लागवडीची परिसरात चांगलीच चर्चा रंगली.

यंदा अतिवृष्टीमुळे कांदा पिकांची मोठ्या प्रमाणात हानी झाली. पाठवलेला उन्हाळ कांदा आणि खरीप कांदा हातचा गेल्या. मोठा तुटवडा झाल्याने दर आकाशाला भिडले. सरकारने निर्यात बंदी केली. याबाबत खासदार भारती पवार यांनी संबंधित मंत्र्यांकडे निर्यात बंदी उठवण्यासाठी पाठपुरावा. दिल्लीत पाठपुरावा केला अन् गावात त्या कांदा लागवडीसाठी बांधावरही पोहोचल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com