खासदार भारती पवारांना महिलांनी सुनावले....आठ दिवस मनमाडला राहून पहा! 

आज खासदार भारती पवार यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याशी फोनवरून उपोषणकर्त्यांचे बोलणे करून दिले. येत्या ११ तारखेला मंत्रालयातील बैठकीत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्‍वासन पालकमंत्र्यांनी दिल्याने खासदार पवार यांच्या उपस्थितीत या पाचही उपोषणकर्त्यांना तेजस्विनी निस्ताने या लहान मुलीच्या हस्ते शीरखुर्मा घेऊन उपोषणाची सांगता केली.
खासदार भारती पवारांना महिलांनी सुनावले....आठ दिवस मनमाडला राहून पहा! 

मनमाड : शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सोडविण्याच्या मागणीसाठी शहरातील पाच युवकांनी उपोषण सुरु केले होते. त्यात मध्यस्थी करण्यासाठी कार्यकर्ते, नागरीकांनी विनंती केल्याने भाजपच्या नवनिर्वाचीत खासदार डॉ. भारती पवार मतदारसंघातील मनमाडला गेल्या. यावेळी त्यांनी प्रश्‍न सोडविण्याचे आश्‍वासन देत उपोषण मागे घेण्याची विनंती केली. यावेळी उपोषण थांबविण्यात ओल मात्र पाण्यासाठी संतप्त महिलांनी त्यांना "आठ दिवस मनमाडला राहून दाखवा मग तुम्हाला आमचे दुःख कळेल'' असे सुनावले. 

मंत्रालयात येत्या ११ तारखेला होणाऱ्या बैठकीत करंजवण योजनेसंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्‍वासन खासदार भारती पवार यांनी दिल्याने गेल्या तीन दिवसांपासून पाच तरुणांचे सुरू असलेले बेमुदत उपोषण आज स्थगित करण्यात आले. करंजवण- मनमाड जलवाहिनी योजना मंजूर करण्याच्या मागणीसाठी गेल्या तीन दिवसांपासून अमित बाकलीवाल, मनोज गांगुर्डे, डॉ. अमोल गुजराथी, डॉ. सुहास जाधव व सतीश न्हायदे या पाच तरुणांनी उपोषणाचे हत्यार उपसले होते. गेल्या तीन दिवसांपासून विविध सामाजिक, राजकीय क्षेत्रांतील पदाधिकारी, डॉक्‍टर, नागरिकांनी उपोषणाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. 

आज खासदार भारती पवार यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याशी फोनवरून उपोषणकर्त्यांचे बोलणे करून दिले. येत्या ११ तारखेला मंत्रालयातील बैठकीत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्‍वासन पालकमंत्र्यांनी दिल्याने खासदार पवार यांच्या उपस्थितीत या पाचही उपोषणकर्त्यांना तेजस्विनी निस्ताने या लहान मुलीच्या हस्ते शीरखुर्मा घेऊन उपोषणाची सांगता केली. ज्या मागणीसाठी आम्ही उपोषणास बसलो ती जर मागणी मंजूर झाली नाही, तर पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसू, असा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला. 

यावेळी माजी आमदार राजेंद्र देशमुख, प्रांताधिकारी पाटील, तहसीलदार देशमुख, मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेनकर, गटनेते गणेश धात्रक, उपनगराध्यक्ष राजेंद्र आहिरे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे, पंकज खताळ, शहराध्यक्ष जय फुलवानी, सचिन दराडे, डॉ. प्रताप गुजराथी, माजी नगराध्यक्ष साईनाथ गिडगे, शिवसेना शहरप्रमुख मयूर बोरसे, सुनील पाटील, नगरसेवक रवींद्र घोडेस्वार, लियाकत शेख यांच्यासह सर्वपक्षीय नगरसेवक, विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com