धरणाच्या गळतीकडे 40 वर्षे लक्ष गेले नाही का? - खासदार भारती पवार

कळवण येथील ओतून धरण 1976 मध्ये बांधले. तेव्हापासून त्यातून गळती होत आहे. आता ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना ही गळती दिसली नाही का?. हे कसे घडले अशी प्रश्‍नांची सरबत्ती करीत खासदार भारती पवार यांनी जलसंपदाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
धरणाच्या गळतीकडे 40 वर्षे लक्ष गेले नाही का? - खासदार भारती पवार

कळवण ः कळवण येथील ओतून धरण 1976 मध्ये बांधले. तेव्हापासून त्यातून गळती होत आहे. आता ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना ही गळती दिसली नाही का?. हे कसे घडले अशी प्रश्‍नांची सरबत्ती करीत खासदार भारती पवार यांनी जलसंपदाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

खासदार डॉ. भारती पवार यांच्या अध्यक्षतेखाली उत्तर महाराष्ट्र जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता कुलकर्णी यांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी मतदारसंघातील जलसंपदा विभागाचा आढावा घेण्यात आला. जलसंपदा विभागाच्या धारणाविषयी सखोल माहिती घेण्यात आली. 

ओतूर धरण 1976 साली बांधून पूर्ण झाले. तेव्हापासून आजपर्यंत त्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत आहे. इतक्‍या दिवसात या प्रलंबित प्रश्नाकडे जलसंपदा विभागाने लक्ष का दिले नाही?. त्यावर काहीच केले नाही असे दिसते. त्यामुळे धरणातून व आडव्या सांडव्यातून होणारी गळती संदर्भात चर्चा चांगलीच तापली. त्यासंदर्भात काय काय उपाययोजना करता येतील तसेच याबाबत सर्व उपाययोजना करून सुधारित प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव एक महिन्यात शासनास सादर करण्यात यावा असे यावेळी सुचित करण्यात आले. 

सदर काम करताना कालमर्यादा निश्‍चित करण्यात आली आहे. विभागाच्या उपअभियंता यांनी सदर कामासंदर्भात पाठपुरावा करून प्रस्ताव तात्काळ सादर करण्याचे निश्‍चित केले. 

यावेळी अधीक्षक अभियंता नाईक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधिकारी, डॉ. आत्माराम कुंभार्डे, कृष्णराव पारखे, जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम माजी सभापती रवींद्र देवरे, "माविप्र' संस्थेचे माजी संचालक नारायण हिरे, सुभाष शिरोडे, रवी सोनवणे, मावंजी गायकवाड, दादा मोरे, प्रवीण रौंदळ यासह विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com