पुणे-नगर रस्ता वाहतूक कोंडीचा प्रश्न दिल्लीत : खासदार कोल्हेंचे गडकरींना निवेदन

...
mp amol kolhe meets nitin gadkari
mp amol kolhe meets nitin gadkari

पुणे : पुणे-नगर राष्ट्रीय महामार्गावरील कोंडीमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांचा प्रश्न खासदार अमोल कोल्हे यांनी केंद्रीय भूपृष्ट वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मांडला. या रस्त्यावरील कोंडी फोडण्यासाठी तातडीने प्रकल्प सल्लागाराची नियुक्ती करण्याची मागणी त्यांनी केली.

या रस्त्यावरील कोंडीचा फटका मराठवाडा, विदर्भात जाणाऱ्या वाहनांना बसत आहे. तसेच स्थानिक नागरिकही हैराण झाले आहेत. येथे रांजणगाव औद्योगिक वसाहत असल्याने येथील गुंतवणुकीलाही या वाहतूक कोंडीचा फटका बसत आहे. त्यामुळे येथील कोंडी ही मोठी समस्या बनली आहे.

याबाबत कोल्हे यांनी गडकरी यांना भेटून पुणे-नगर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्याच्या दृष्टीने त्वरित डीपीआर कन्सल्टंट ची नेमणूक करून रस्ता रुंदीकरणाविषयी निवेदन दिले. त्यामुळे वाघोली, शिक्रापूर, रांजणगाव परिसरातील वाहतूक कोंडी कमी होईल. तसेच नाशिक फाटा ते चांडोली पुणे-नाशिक महामार्ग सहापदरी करण्याबाबत चर्चा केली. चाकण आणि एमआयडीसी चौक येथे उड्डाणपूल करावे, अशी मागणी त्यांनी केली. गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन संबंधित अधिकाऱ्यांना तसे आदेश दिल्याचे कोल्हे यांनी सांगितले.

लोकसभेत शून्य प्रहरात त्यांनी चाकण विमानतळ प्रकल्पाचा विषय उपस्थित केला. येथे विमानतळ होणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com