खासदार आढळराव- आमदार लांडगे दिलजमाई : भोसरीतूल सर्वाधिक लीड देण्याची ग्वाही!

खासदार आढळराव- आमदार लांडगे दिलजमाई : भोसरीतूल सर्वाधिक लीड देण्याची ग्वाही!

शिक्रापूर/ पिंपरी  :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला आणि भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे हे शिवसेनेचे शिरुरचे उमेदवार शिवाजीराव आढळरावदादा यांच्या प्रचारातच थेट शुक्रवारी सामील झाले. तत्पूर्वी त्यांच्यात 'आरएसएस'मुळे समेटही झाला. यामुळे आढळराव भोसरीत काहीसे निश्चिंत झाले आहेत.

शिरुर लोकसभा मतदार संघात सर्वाधिक मताधिक्य भोसरी विधानसभा मतदारसंघात देईन, असे म्हणत आमदार महेश लांडगे आणि शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव यांनी गळाभेट घेतली आणि भाजपा-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची बहुप्रतिक्षित दिलजमाई आज भोसरीत झाली. 

आढळराव आणि भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्यातील गेल्या साडेचार वर्षांतील शीतयुद्ध चांगलेच गाजले. आमदार लांडगे यांनी तर थेट आढळराव यांच्या विरोधातच लोकसभा लढविण्याचे संकेतही तीन वर्षांपूर्वी दिले होते.

याच पार्श्वभूमीवर भाजपा-शिवसेना युती झाल्यानंतर आमदार महेश लांडगे नेमकं काय करणार, याची उत्सुकता होती. गेल्या तीन वर्षांच्या काळात दोघांमध्ये अनेक आरोप-प्रत्यारोप झाले होते आणि आही प्रकरणात अगदी कायदेशीर अडकविण्याचा प्रयत्नहे दोहों बाजूंनी झाला होता. पालकमंत्री गिरीश बापट यांनीही गेल्या आठवड्यात दोघांना एकाच व्यासपीठावर आणून पॅचअप करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तरीही दोघांमधील दूरी कायम होती.

आज आमदार लक्ष्मण जगताप, शरद सोनवणे आदींच्या उपस्थितीत दोन्ही नेत्यांची तब्बल पावनेदोन तास बैठक झाली. यात दोन्हीं बाजूंनी एकमेकांच्या मनातील खदखद बाहेर काढण्यात लक्ष्मण जगताप यांनी मोठी भूमिका बजावली व सरतेशेवटी दोघांची दिलजमाई एकमेकांची गळाभेट होवून करण्यात आली. 

यावेळी आमदार महेश लांडगे यांनी खासदार शिवाजीराव आढळरावांसह सर्वच मान्यवरांना ग्वाही दिली की, मी आणि माझे संपूर्ण पदाधिकारी-कार्यकर्ते लगेच प्रचाराच्या कामाला लागत असून शिरुर लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदार संघात सर्वाधिक मताधिक्य देण्याची जबाबदारी आपण घेत आहोत. याबाबत खासदार शिवाजीराव आढळराव यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, आम्हा दोघांच्याही मनात एकमेकांबद्दल जे काही समज-गैरसमज होते ते आम्ही समोरासमोर बसून दूर झाले असून भविष्यात दोघांच्याही हिताचे दृष्टीने काम करण्याबाबत दोघांचेही एकमत झाले आहे. यावेळी भाजपाचे स्थानिक आजी माजी महापौर व अनेक जेष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. 

हे मुद्देही लागले मार्गी..

आढळराव-लांडगे यांच्यातील वाद पराकोटीला गेला होता. काही कायदेशीर स्तरावरही ही भांडणे सुरू होती. या शिवाय आगामी विधानसभा निवडणूकीसाठी भोसरी विधानसभा मतदार संघ लांडगे यांचेसाठी सुरक्षित राहणे हाही लांडगे यांचा प्राधान्यक्रम आहेच. या सर्व मुद्द्यांचा परामर्शही यावेळी घेण्यात आला. अर्थात भाजपा-शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत ही भांडणे पोहचली असताना तिथूनच ही दिलजमाईची सुरवात झाल्याचेही खात्रिलायक सूत्रांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com