mother saw son bachu kade as minister | Sarkarnama

आईने लाडक्‍या बच्चूला मंत्री होताना डोळे भरून पाहिले ! 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 31 डिसेंबर 2019

मुंबई : शेतकऱ्यांचे लढाऊ नेते बच्चू कडू यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या कार्यक्रमाला त्यांनी आईला सोबत आणले होते. आईचा हात धरून कार्यक्रमस्थळी जातानाचा व्हिडिओ सोशन मीडियावर प्रचंड व्हायरल झाला.

मंत्री कडू यांनी हा व्हिडिओ ट्विट केला असून त्यामध्ये स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी ! असे म्हटले आहे. 

बच्चू कडू यांना शिवसेनेच्या कोट्यातून मंत्री करण्यात आले आहे. कडू हे शेतकऱ्यांसाठी लढणारे नेते म्हणून ओळखले जातात. शेतकऱ्यांना नाडणाऱ्या अधिकाऱ्यांना आतापर्यंत त्यांनी वटणीवर आणले आहे. आता तर ते मंत्री बनले आहेत त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्यांचे प्रश्‍न अधिकाऱ्यांनी

सोडविलेच पाहिजे यासाठी ते आग्रही असतात. बच्चू कडूंच्या मंत्री होण्याने शेतकरी वर्गात मोठा आनंद आहे. आपला माणूस मंत्री झाल्याची भावनाही असल्याचे शेतकऱ्यांची चेहऱ्यावर दिसून येत आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख