`आईचे निधन झालेय; मात्र अंत्ययात्रेला येऊ नका, असाल तिथेच प्रार्थना करा!`

citizens observing lockdown norms in Nashik
do not come for cremenation
do not come for cremenation

वणी : येथील रखमाबाई किसन झोटिंग (वय 70) यांचे निधन झाले. त्याचा निरोप सोशल मिडीया व दूरध्वनीवरुन आप्तस्वकीयांना देण्यात आला. मात्र हा निरोप देतांना "आईचे निधन झाले आहे. मात्र अंत्ययात्रा, रक्षा विसर्जनासाठी येऊ नका. असाल तिथेच प्रार्थना करा' असा संदेश देण्यात आला. कुटुंबातील मोजक्‍या व्यक्तींनी अंत्यसंस्कार केले. तेसुद्धा प्रत्येकाला सॅनीटायझर वारंवार हात स्वच्छ करुन. परिसरातील सगळ्यांसाठी "लॉकडाऊन'च्या काळात घालून दिलेला हा एक आदर्श ठरला आहे.

किसन (भगत) काळू झोटिंग यांची पत्नी व गावातील व्यावसायिक प्रकाश व दिपक यांच्या आईचे शनिवारी सकाळी नाशिकच्या रुग्णालयात निधन झाले. गावात परिचीत कुटुंब असल्याने अंत्ययात्रेला मोठी गर्दी अपेक्षीत होती. मात्र प्रशासन, पोलिस अथवा इतरांनी काही सूचना करण्याआधी त्यांनी स्वतःच वेगळा निर्णय घेतला. कुटुंबातील सदस्यांतच अंत्यसंस्कार केले.

लग्न आणि अंत्ययात्रेला आवर्जुन उपस्थित राहण्याचा सामाजिक प्रघात आहे. मात्र "कोरोना'ने हे प्रघातही मोडीत काढले आहेत. लॉकडाऊन आणि संचारबंदीमुळे मंगल कार्यालये बंद आहेत. विवाहाचे मुहुर्त पुढे ढकलण्यात आले आहे. अंत्यसंस्कारावरही त्याचे परिणाम दिसून आले आहेत. झोटींग यांच्या निधनाची माहिती समजल्यावर "कोरोना'च्या पार्श्वभूमीवर अत्यंविधी मोजक्‍याच उपस्थितीत करण्याचा निर्णय घेतला. आप्त, स्वकीयांना सोशल मिडीया, तसेच दुरध्वनीवकरुन माहिती देण्यात आली. मात्र त्यात "आईचे निधन झाले आहे. मात्र अंत्यविधी, रक्षाविसर्जनासाठी येऊ नका. असाल तीथेच प्रार्थना करा.' या प्रघाताहून वेगळ्या निरोपामुळे तो चर्चा, परिसरासाठी आदर्श ठरला. अत्यंविधीसाठी उपस्थित कुटुंबातील सदस्यांनीही आपल्याबरोबरच इतरांची काळजी घेण्यासाठी प्रत्येकाने तोंडाला मास्क, रुमाल बांधला होता. प्रत्येकाच्या हातावर वारंवार सॅनिटायझर टाकून दोन व्यक्तीमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळून अत्यंविधी झाला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com