माझ्यातली आई आज सुन्न, निःशब्द झालीय - यशोमती ठाकूर

mother in me gets speechless says minister yashomati thakur
mother in me gets speechless says minister yashomati thakur

नागपूर ः हिंगणघाट जळीत कांडातील पिडीतेची आज पहाटे मृत्यू झाला. या घटनेनं संपूर्ण सामाजिक कार्यकर्त्यांसह राजकीय नेत्यांकडून राज्यभर संताप व्यक्त केला जात आहे. "माझ्यातली आई आज सुन्न, निःशब्द झाली' अशी भावना महिला ब बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी ट्‌विटरवर व्यक्त केली.

माझ्यातली आई आज सुन्न, नि:शब्द झालीय. महाराष्ट्राच्या लेकीचा जीवनाशी संघर्ष संपला, आपण या हिंसक-पुरुषी सिकतेशी संघर्ष सुरू करूया, असे आवाहन श्रीमती ठाकूर यांनी केले आहे. पीडितेचा मृत्यू अतिशय दु:खद आहे. महिला सुरक्षितेबाबत जागृत राहणे गरजेचे आहे, असेही मत यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केले. 3 फेब्रुवारीला पीडितेवर विकृत विकेश नगराळे याने पेट्रोल टाकून भरचौघात पेटून दिले होते. त्यानंतर तिच्यावर नागपूर येथे ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचार सुरु असताना, आज आज पहाटे 6.55 वाजता तिने अखेरचा श्वास घेतला. गेल्या सात दिवसांपासून पीडित शिक्षिकेची मृत्यशी असलेली झुंज अखेर अपयशी ठरली. 

शनिवारपासूनच पीडितेला श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. हिंगणघाट जळीतकांड पीडितेला वाचवू शकलो नाही, अशी प्रतिक्रिया पीडितेवर उपचार करणारे डॉ. राजेश अटल यांनी दिली.

काल रात्रभर तिला वाचवण्याचे प्रयत्न सुरु होते. मात्र, पीडितेची प्रकृती खालावली होती. डॉक्‍टरांनी दिलेल्या माहितीनुसार, काल रात्रीपासून उपचारादरम्यान पीडितेचे हृदय दोन वेळा बंद पडले होते. हृदयविकाराचा धक्का बसल्याने तिची प्रकृती खालावली. तिला वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले. मात्र तिचा मृत्यू झाला.

हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. या घटनेनंतर समाजाने आत्मचिंतन करण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया वर्ध्याचे पालकमंत्री सुनील केदार यांनी दिली आहे. माझ्या मुलीला त्रास झाला, तसा त्या आरोपीला झाला पाहिजे. लवकर या प्रकरणाचा निकाल लागावा, निर्भयासारखं प्रकरण लांबायला नको, असा संताप पीडितेच्या वडिलांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com