नेटकऱ्यांचा कौल : एकनाथराव खडसेंनी शिवसेनेत प्रवेश करावा

राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते एकनाथराव खडसे पक्षातरांच्या मार्गावर आहेत. त्यांनी दिल्लीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतली. तर कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी खडसे कॉंग्रेसमध्ये यावेत असे मत व्यक्त केले. त्यामाध्यमातून खडसेंनी कोठे प्रवेश करावा? या "सरकारनामा'च्या प्रश्नावर खडसेंनी शिवसेनेत प्रवेश करावा असे बहुतांश नेटकऱ्यांना वाटते.
एकनाथराव खडसे
एकनाथराव खडसे

जळगाव : राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते एकनाथराव खडसे पक्षातरांच्या मार्गावर आहेत. त्यांनी दिल्लीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतली. तर कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी खडसे कॉंग्रेसमध्ये यावेत असे मत व्यक्त केले. त्यामाध्यमातून खडसेंनी कोठे प्रवेश करावा? या "सरकारनामा'च्या प्रश्नावर खडसेंनी शिवसेनेत प्रवेश करावा असे बहुतांश नेटकऱ्यांना वाटते.

खडसे यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याबाबत सर्वाधिक 60 टक्के त्या खालोखाल राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करण्याबाबत 20 टक्के तर राष्ट्रवादीत प्रवेशाबाबत 10 टक्के नागरिकांनी कौल दिला आहे. तर 10 टक्के नागरिकांनी कोणत्याही पक्षात न जाता भाजपतच रहावे असे मत व्यक्त केले आहे.

एकनाथराव खडसे यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याबाबत अनेकांनी खुले मत व्यक्त केले आहे. शैलेश सोनार, अविनाश वाघमोडे, संदिप गवळी, विनोद गावडे, विलास खोत, विशाल विरकर, अंकुश कोलते, सुमित बनगर, बालाजी पवार, विश्‍वास शेडेंकर, अशोक गावरे,निलेश पाटील यांच्यासह अनेकांनी एकनाथराव खडसे यांनी शिवसेनेत प्रवेश करावा असे मत व्यक्त केले आहे. तर रमेश मोरे, दुर्गेश कुलकर्णी, यांच्यासह अनेकांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रवेश करावा असे मत व्यक्त केले आहे. चंदर भोसले, नामदेव परब,यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करावा असे मत व्यक्त केले आहे. निलेश पुकोले यांनी राष्ट्रीय समाज पक्षात जाण्याचा सल्ला दिला आहे.

या शिवाय सुरेश गौरव यांनी गोपीनाथ मुंडेच्या नावाने पक्ष काढून त्यांचा आदर्श समोर ठेवून वाटचाल करावी असा सल्ला दिला आहे. मनोज लोखंडे यांनी ओबीसींना घेवून नवीन पक्ष काढतील असे म्हटले आहे. लक्ष्मण गराडे, नरेंद्र फतकल, अर्जुन डुंबरे,हरिश गजरे,नितीन माळी यांच्यासह अनेकांनी खडसे यांनी भाजपतच रहावे असे म्हटले आहे. 

लक्ष्मण गराडे म्हणतात, एक तर पक्ष सोडूच नये,पक्ष नेतृत्वाशी जमवून घ्यायला पाहिजे. दुसऱ्या पक्षात पण स्वतंत्रता नसते. तेवढया पुरते बरे मग कोणी विचारीत नाही. पक्ष सोडला कि संपूर्ण करीअर संपते.

संन्यास घेणे, घरीच बसण्याचा सल्ला
एकनाथराव खडसे यानीं कोणत्याही पक्षात न जाता संन्यास घ्यावा असे मतही काहीनी व्यक्त केले आहे. सम्राट तरकसे म्हणतात, खडसे यांनी बिनधास्तपणे आपल्या शेतात काम सुरू करावे व नवीन नेतृत्वाला संधी उपलब्ध करून द्यावी. गणपतराव तेले म्हणतात, निवांत हरिभजन करीत घरी बसावं, दुसऱ्या पक्षात जाणे म्हणजे स्वत:च अस्तित्व हिरावणे असेच आहे. दिपक सपकाळ पाटील म्हणतात, खडसे यांनी रिटायरमेंट घेवून आत्मचरित्र लिहून भूंकप निर्माण करावा, सुजित मोरे म्हणतात, आता त्यांनी सरळ घरीच बसावे, रोहिदास वाळूंज यांनी खडसे यांना आपल्या वयाचा विचार करण्याचा सल्ला दिला आहे. संदिप गिते यांनी मात्र खडसेंना ईशाराच दिला आहे, ते म्हणतात ते भाजपतून बाहेर पडल्यास त्यांचा राणेकाका होईल. सुभाष यादव म्हणतात, खडसे यांनी कोणत्याही पक्षात जावे. परंतु अगोदर भाजप सोडावी. श्रीराम बुटेट्‌ यांनी नवीन पक्ष काढण्याचा सल्ला दिला आहे. तर काही जणांनी ओबीसींचा नवीन पक्ष काढण्याचाही सल्ला दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com