एकच मिशन वंजारी आरक्षण; बीडमध्ये मोर्चा धडकला

एकच मिशन वंजारी आरक्षण; बीडमध्ये मोर्चा धडकला

बीड : लोकसंख्येच्या तुलनेत समाजाला आरक्षणाचा टक्का कमी आहे. परिणामी समाजाचे नुकसान होत आहे. समाजाला वाढीव आरक्षण द्यावे, या मागणीसाठी  बुधवारी (ता. २८) वंजारी समाजाचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.

`एकच मिशन वंजारी आरक्षण` आदी घोषणांनी परिसर दणाणून गेला. समाजाला वाढीव आरक्षण मिळावे या मागणीसाठी कृती समियीने मागच्या काही दिवसांत समाजात बैठका घेऊन जनजागृती केली. या मागणीचे निवेदन सोमवारी मुख्यमंत्र्यांनाही देण्यात आले. बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

आरक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे, एकच मिशन वंजारी आरक्षण असा मजकूर लिहलेले फलक आणि टोप्या घालून समाज बांधव सहभागी झाले होते. घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुलींची भाषणे झाली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येईल. महिलांचाही मोर्चात मोठा सहभाग होता. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com