मॉन्सून महाराष्ट्रात दाखल; दक्षिण कोकणात दमदार हजेरी - monsoon | Politics Marathi News - Sarkarnama

मॉन्सून महाराष्ट्रात दाखल; दक्षिण कोकणात दमदार हजेरी

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 8 जून 2017

पुणे - कर्नाटकात दाखल झालेला मॉन्सून वेगाने महाराष्ट्राकडे सरकत आहे. गुरूवारी (ता.८) मॉन्सूनने गोवा आणि दक्षिण कोकणातील वेगुर्लापर्यत मजल मारली. मुंबई आणि कोकणाचा उत्तर भाग, मध्य महाराष्ट्रात शनिवारी (उद्या) किंवा रविवारी दाखल होईल. परिणामी गोवा, कोकणाचा दक्षिण भागात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाच्या सुत्रांनी व्यक्त केला. 

पुणे - कर्नाटकात दाखल झालेला मॉन्सून वेगाने महाराष्ट्राकडे सरकत आहे. गुरूवारी (ता.८) मॉन्सूनने गोवा आणि दक्षिण कोकणातील वेगुर्लापर्यत मजल मारली. मुंबई आणि कोकणाचा उत्तर भाग, मध्य महाराष्ट्रात शनिवारी (उद्या) किंवा रविवारी दाखल होईल. परिणामी गोवा, कोकणाचा दक्षिण भागात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाच्या सुत्रांनी व्यक्त केला. 

सध्या मॉन्सूनला अरबी समुद्र, कर्नाटक, गोवा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात दाखल होण्यासाठी अनुकूल स्थिती तयार झाली आहे. तसेच कर्नाटक, रायलसीमा, आंध्रप्रदेश या भागातही व्यापण्यासाठी पोषक स्थिती आहे. तसेच बंगालचा उपसागर, त्रिपूरा, आसाम, मेघालय, हिमालय, पश्चिम बंगाल या भागात अनुकूल स्थिती तयार होत आहे. अरबी समुद्रात तयार झालेले चक्राकार वारे ओमानकडे सरकल्यामुळे रेंगाळलेला मॉन्सून सक्रिय झाल. त्यामुळे गुरूवारपर्यत थेट दक्षिण कोकणापर्यत मॉन्सून दाखल झाला अाहे. 

उत्तर भारतातील पंजाब ते उडिसाचा उत्तर भाग, राजस्थानचा उत्तर भाग ते बंगाल चा उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. हे क्षेत्र मध्यप्रदेशचा उत्तर भाग, छत्तीसगड आणि उडिसा या भाग व्यापण्याची शक्यता आहे. जम्मू आणि काश्मिर या भागातही चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाली असून ती समुद्रसपाटीपासून ३.१ आणि ३.६ किलोमीटर उंचीवर आहे.

पाकिस्तानच्या मध्यभागातही चक्राकार वाऱ्याचे क्षेत्र तयार झाले असून ते राजस्थानच्या पश्चिम भागापर्यत आहे. समुद्रसपाटीपासून ते २.१ किलोमीटर उंचीवर आहे. बंगाल उपसागराचा पूर्व भाग, आणि अंदमान समुद्राचा उत्तर भागात समुद्रसपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. आंध्रप्रदेश आणि बंगाल उपसागर, उडिसाचा दक्षिण भागातही चकाक्रार वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. बिहारचा आग्नेय भाग व परिसरात चकाक्रार वाऱ्याचे स्थिती तयार झाली आहे.

ही स्थिती समुद्रसपाटीपासून दीड किलोमीटर उंचीवर आहे. तसेच छत्तीसगडच्या दक्षिण भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता असून ती समुद्रसपाटीपासून नऊशे मीटर उंचीवर आहे. 

देशातील बहुतांशी भागात ढगाळ वातावरण असून काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे. गेल्या ४८ तासामध्ये हिमाचलप्रदेश, उत्तराखंड, बिहार, कोकण, गोवा, कर्नाटक, आंध्रप्रदेश, केरळ, अंदमान व निकोबार परिसरात जोरदार पाऊस झाला. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, तेलंगाना, कर्नाटकाचा दक्षिण भागात मध्यम ते जोरदार पाऊस झाला.

 येत्या दोन ते तीन दिवसात जम्मू आणि काश्मिर, हरियाना, मध्य प्रदेसचा पश्चिम भाग, उत्तर प्रदेशचा पश्चिम भाग, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, छत्तीसगड, बिहार, पश्चिम बंगाल, सिक्कीम, आसाम, मेघालय, त्रिपूरा, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगाना, केरळ, तमिळनाडू, अंदमान व निकोबार परिसरात मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख