'आशीर्वाद' तर  मोनिका राजळेंनाच,आता गर्जे-काकडे करणार काय ?

विद्यमान आमदार मोनिका राजळे यांनाच आशीर्वाद द्या असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनसमुदायाला केल्याने आता भाजपमधील इतर इच्छुक काय करणार हे पाहणे महत्वाचे ठरेल .
Monika-Rajale--Harshada-Kakade
Monika-Rajale--Harshada-Kakade

नगर  :  पाथर्डी विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या नेत्यांनी विधानसभेच्या तयारीसाठी बैठका सुरू केल्या आहेत. आमदार मोनिका राजळे यांची पुन्हा उमेदवारीसाठी जोरदार तयारी झाली असली, तरी याच पक्षातून तीन नेते बंडखोरीच्या पवित्र्यात आहेत. 

भाजपचे युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अमोल गर्जे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य नितीन काकडे व जनशक्तीच्या नेत्या हर्षदा काकडे यांनीही विधानसभेसाठी मोर्चेबांधणी केल्याने पक्षांतर्गत आव्हाने स्विकारत आमदार राजळे यांना रिंगणात उतरावे लागणार आहे.

नुकत्याच झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या सभेत आमदार राजळे यांनाच वरिष्ठांचे आशीर्वाद असल्याचे स्पष्ट झाले आहे. खुद्द मुख्यमंत्र्यांनीच राजळे यांचे काैतुक करताना जनतेने राजळे यांना आशीर्वाद द्यावेत, असे सांगितले . त्यामुळे राजळेंची उमेदवारी निश्चित मानली जाते. असे असले, तरी पक्षांतर्गत गटबाजी काही थांबली नाही. पक्षांतर्गत तीन गटांनी राजळे यांच्यासमोर आव्हान उभे केले असल्याने राजळे यांना उमेदवारी मिळाली, तरी हे गट राजळे यांचे काम करणार की त्यांच्या विरोधात कुरघोडी करणार, हे काळच ठरविणार आहे.

भाजपपुढे आव्हान राष्ट्रवादीचे 
भाजपच्या उमेदवारापुढे राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या उमेदवाराचे आव्हान असेल. राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अॅड. प्रताप ढाकणे व पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांच्यापैकीच उमेदवारी असेल. त्यामुळे भाजपपुढे या उमेदवाराचे आव्हान असणार आहे. भाजपच्या नाराज गटाची नाराजी काढण्यात भाजपचा उमेदवार यशस्वी झाला नाही, तर त्याचा फायदा राष्ट्रवादीच्या उमेदवारास होणार आहे. विशेषतः राष्ट्रवादीकडून अॅड. ढाकणे यांना उमेदवारी मिळाल्यास ढाकणे यांचे भाजपच्या बहुतेक नेत्यांचे चांगले साैख्य आहे. फोडाफोडीच्या राजकारणात त्यांना फायदा होऊ शकतो, अशीच शक्यता आहे.

 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com