शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी मोनिका राजळे आक्रमक

....
monika rajale
monika rajale

शेवगाव : ""जायकवाडी धरणातून पाणीउपसा करणाऱ्या शेतकऱ्यांवर दाखल केलेले गुन्हे त्वरित मागे घ्यावेत, तसेच नवीन पाणीउपसा परवाने व जुन्या परवान्यांच्या नूतनीकरणासाठी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना सहकार्य करावे, अन्यथा आंदोलन करू,'' असा इशारा आमदार मोनिका राजळे यांनी दिला आहे.

राजळे यांच्या जनसंपर्क कार्यालयात धरणग्रस्त कृतिसमितीची बैठक झाली. त्या वेळी राजळे बोलत होत्या. जायकवाडी उपसासिंचन योजनेचे उपअभियंता अविनाश पांडोळे, शाखा अभियंता सुभाष गायकवाड, कालवा निरीक्षक राजेंद्र दराडे, भाजपचे तालुकाध्यक्ष ताराचंद लोढे, बापूसाहेब भोसले, वाय. डी. कोल्हे, भीमराज सागडे आदी उपस्थित होते. 

"पाणीउपसा परवान्यांची निश्‍चित कालमर्यादा आहे. नवीन परवाना व नूतनीकरण पद्धतीची, तसेच कारखान्यांनी कपात केलेल्या पाणीपट्टीची माहिती शेतकऱ्यांना द्यावी,' अशी सूचना राजळे यांनी केली. 

... तर मोठा उद्रेक होईल

जायकवाडी धरणाच्या फुगवट्यावर पाणीचोरी होत असल्याची जनहित याचिका औरंगाबाद खंडपीठात दाखल झाली होती. त्यानुसार तालुक्‍यातील 12 शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. शेतकऱ्यांना दिलेले पाणीपरवाने बनावट असल्याचे उघड झाले असून, त्याची चौकशी करावी व संबंधितांवर कारवाई करावी. साखर कारखान्यांनी उसाच्या पेमेंटमधून कपात केलेल्या पाणीपट्टीच्या पावत्या शेतकऱ्यांना मिळाल्या नाहीत. कारखान्याने कपात केलेली पाणीपट्टी व प्रत्यक्षात पाटबंधारे विभागाला मिळालेली रक्कम, यात मोठी तफावत आहे. पाणीपट्टी कपात असतानाही शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केले. जायकवाडीमुळे आम्ही विस्थापित झालो, आता पुन्हा आमच्यावरच गुन्हे दाखल होत असतील, तर मोठा उद्रेक होईल, असा इशारा शेतकरी बंकट सानप, संदीप खरड, बापूसाहेब भोसले आदींनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com