ढाकणवाडीत राजळे, ढाकणेंना एकही मत नाही ? - Monica Rajale Pratap Dhakane won't get a single vote in Dhakanwadi | Politics Marathi News - Sarkarnama

ढाकणवाडीत राजळे, ढाकणेंना एकही मत नाही ?

सरकारनामा
सोमवार, 21 ऑक्टोबर 2019

..

पाथर्डी (नगर)  : तालुक्‍यातील ढाकणवाडी (वडगाव) येथे भाजपच्या मोनिका  राजळे आणि राष्ट्रावादीचे ढाकणे यांना  एकही मत मिळणार नाही कारण नाही येथील ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला. कोणत्याही नेत्याने गावात विकासकामे केली नसल्याने हा निर्णय घेतल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

दिवसभरात तेथे एकही मतदान झाले नाही. ज्येष्ठ नेते बबनराव ढाकणे व आमदार मोनिका राजळे यांनीही गावकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, गावकरी आपल्या निर्णयावर ठाम होते.

दरम्यान, डांगेवाडी येथील एकाने मतदान करतानाचे चित्रीकरण करून ते सोशल मीडियात "व्हायरल' केले. विशेष म्हणजे मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास बंदी असताना, हे चित्रीकरण कसे झाले, याबाबत चर्चा होती. संबंधितावर कारवाई केली जाणार असल्याची माहिती मिळाली.

तालुक्‍यात आज शांततेत मतदान झाले. कासार पिंपळगाव येथे मुलगा कृष्णा राजळे यांच्यासोबत आमदार राजळे यांनी सकाळी मतदान केले. "राष्ट्रवादी'चे उमेदवार ऍड. प्रताप ढाकणे यांनी पत्नी प्रभावती ढाकणे यांच्यासोबत अकोला येथे मतदान केले. पोलिस व महसूल प्रशासनाने दिवसभर अतिशय नेटके नियोजन केल्याने मतदानप्रक्रिया शांततेत पार पडली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख