पंकजा मुंडेंसमोर 'कमबॅक'साठी मोनिका राजळेंनी ठेवला पाथर्डीचा पर्याय

मोनिका राजळे या पंकजा मुंडेंच्या निकटवर्तीय आणि खास मानल्या जातात. त्यांच्या समर्थकांनी तशा पोस्टही सोशल मिडीयाच्या माध्यमातून व्हायरल केल्या आहेत.
Pankaja Munde Monica Rajale.
Pankaja Munde Monica Rajale.

बीड : परळी मतदार संघातून धक्कादायक पराभव पत्कराव्या लागलेल्या भाजप नेत्या आणि राज्याच्या ग्रामविकास व महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यासमोर कमबॅकसाठी पाथर्डी (जि. अहमदान) मतदार संघाचा पर्याय आला आहे. येथून विजयी झालेल्या भाजपच्या मोनिका राजीव
राजळे यांनी राजीनामा देण्याचा प्रस्ताव मुंडेंसमोर ठेवल्याची खात्रीलायक माहिती आहे. 


मोनिका राजळे यांनी शुक्रवारी परळीत येऊन पंकजा मुंडे यांची भेट घेतली व हा पर्याय समोर ठेवला. दरम्यान, या प्रस्तावावर पंकजा मुंडे आणि त्यांची थिंट टँक विचार करत असल्याचीही माहिती आहे. मात्र, त्या विधान परिषदेचा पर्याय निवडणार कि पुन्हा लढण्याचा हे लवकरच कळणार आहे. माेनिका राजळे या पंकजा मुंडेंच्या विश्वासू मानल्या जातात. या निकालाने बीडमधून अशी स्थीती राहीलेली नाही.  

पंकजा मुंडे या भाजपच्या राज्यातील प्रमुख नेत्यांमध्ये आणि सुकाणू समितीमध्येही आहेत. मास लिडर अशी ओळख असलेल्या पंकजा मुंडे यांच्याकडे ग्रामविकास आणि महिला व बालविकास ही महत्वाची खातीही आहेत. दरम्यान, या निवडणुकीत त्यांचा परळी या होमपिचमध्ये  ३० हजारांहून अधिक मतांनी चुलतबंधू धनंजय मुंडे यांनी पराभव केला. जिल्ह्यातही भाजपची मोठी पडझड झाली आहे. 

दरम्यान, आगामी सत्तेत पुन्हा पंकजा मुंडे यांना स्थान निश्चित मानले जात आहे. परंतु, त्या विधीमंडळात विधान परिषदेच्या माध्यमातून जातील असे मानले जात असतानाच आता मोनिका राजळे यांनी त्यांच्यासाठी पाथर्डीची जागा सोडण्याचा प्रस्ताव ठेवल्याची माहिती आहे. त्यांनी शुक्रवारी परळीत येऊन पंकजा मुंडेंची भेट घेऊन हा प्रस्ताव मांडला आहे. 

मात्र, आता पंकजा हा प्रस्ताव स्विकारणार कि विधान परिषदेच्या माध्यमातून विधीमंडळात जाणार हे लवकर कळणार आहे. दरम्यान, परिषदेतून विधीमंडळात जाण्याने ‘मागच्या दाराने’ अशी अवहेलना  होण्याची शक्यता असल्याने मॉरलच्या दृष्टीने हा पर्याय स्विकारावा असे एका गटाचे मत असले तरी पक्ष या पर्यायाला कितपत मान्यता देईल अशीही शंका आहे. 

निवडणुकीपूर्वी पंकजा मुंडेंनी आष्टीतून लढावे असा विचार पुढे आला होता. परंतु, परळीतून येवढा धोका होईल, असा अंदाज आला नसल्याने त्यांनी परळी सोडली नाही. दरम्यान, जिल्ह्यात भाजपचे दोन आमदार विजयी झाले असले तरी केजच्या नमिता मुंदडा राखीव मतदार संघातून आलेल्या असून गेवराईचे लक्ष्मण पवारही कमी फरकानेच आलेले असल्याने रिस्क तर आहेच शिवाय ते पंकजा मुंडेंसाठी अशी काही भूमिका घेतील का, अशीही शंका आहे.

मोनिका राजळे या पंकजा मुंडेंच्या निकटवर्तीय आणि खास मानल्या जातात. त्यांच्या समर्थकांनी तशा पोस्टही सोशल मिडीयाच्या माध्यमातून व्हायरल केल्या आहेत.

मोनिका राजळे यांचा प्रस्ताव मान्य केला तरी सातारा पोटनिवडणुकीच्या निकालाप्रमाणे भिती आहेच. हा प्रस्ताव पंकजा मुंडेंनी स्विकारला तरी पक्ष कितपत मान्यता देईल ही शंका आहे. आणि जर परिषदेच्या माध्यमातून विधीमंडळात जायचे ठरविले तरी मागच्या दाराने अशी उपहासना आहे.

दरम्यान, पहिल्या निवडणुकीत दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांचा पराभव झाला होता. दुसऱ्या निवडणुकीत विजयानंतर पुन्हा तिसऱ्या निवडणुकीत  त्यांना पराभव स्विकारावा लागला होता. नंतर ते सलग तीन वेळा विजयी झाले. त्यावेळी परिषदेवर जाण्या ईतके पक्षाचे बळ नव्हते. आता पक्षाचे १० हून अधिक  जण जानेवारीतच परिषदेवर जाऊ शकतात.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com