मोहिते पाटलांसाठी 2019 हे वर्ष जोरदार! 2020 मध्ये काय होणार?

विजयसिंह मोहिते पाटील आणि रणजितसिंह मोहिते पाटलांसाठी 2020 हे वर्ष कसे जाणार, याची उत्सुकता आहे.
vijaysinh mohite patil
vijaysinh mohite patil

वेळापूर : सोलापूरमध्ये 2019 या वर्षाच्या शेवटच्या दिवशी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी झाल्या. या निवडीनंतर सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्‍यातील मोहिते-पाटील समर्थकांमध्ये नवीन उत्साह निर्माण झाला आहे. सरते वर्ष त्यांच्यासाठी फायदेशीर ठरले असून नव्या समीकरणांकडे लक्ष लागले आहे.

राज्यात महाआघाडीची सत्ता असताना माळशिरस, करमाळा, बार्शी, पंढरपूर, दक्षिण सोलापूर, मंगळवेढा या पंचायत समित्यांमध्ये भाजपप्रणीत आघाडीकडे सत्ता आली. त्यामुळे 2020 पासून भाजपच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात पक्षाच्या जुन्या मंडळींसह समविचारी घटकांना सोबत घेऊन मोहिते-पाटीलच वर्चस्व निर्माण करणार, असा समर्थकांचा विश्‍वास आहे.

या निवडीमुळे जिल्ह्याच्या राजकारणात मोहिते-पाटलांचे आश्‍वासक "कमबॅक' झाल्याचे चित्र आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षांच्या निवडीत मोहिते-पाटील गटाने भाजपप्रणीत समविचारी गटाला सोबत घेत बाजी मारली. गत निवडीच्या वेळी राष्ट्रवादीचे बहुमत असताना मोहिते-पाटलांचे नेतृत्व डावण्यासाठी पक्षातूनच घडामोडी झाल्या. तत्कालीन समविचारी आघाडी निर्माण झाली होती. लोकसभेच्या प्रचंड मताधिक्‍यानंतर विधानसभेच्या माळशिरस तालुक्‍यातील काठावरच्या विजयाने जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी निवडीमध्ये मोहिते-पाटील कुटुंबाची राजकीय प्रतिष्ठा पणास लागली होती. यामध्ये त्यांनी "गाफील' न राहता जुन्या आणि नव्या घटकांची चांगलीच मोट बांधली.

"मी राष्ट्रवादी पक्ष सोडला नाही' या माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या वक्तव्यानंतर पारंपरिक विरोधकांकडून बरीच टीका झाली होती. जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी निवडीकडे आणि मोहिते-पाटील परिवाराच्या भूमिकेकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. भाजपप्रणीत समविचारी आघाडीची मोट मजबूत करीत मोहिते-पाटील परिवाराने भाजपसोबत असल्याचे सिद्ध केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com