दक्षिणेत अटीतटीच्या लढतीत जनतेने मोहन यांनाच दिली 'मते'

अतिशय अटीतटीच्या मानल्या जाणाऱ्या दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे मोहन मते 2800 मतांनी निवडून आले. तीन बंडखोरांमुळे दक्षिण नागपूरची लढत सर्वाधिक चुरशीची झाली होते. येथे भाजपचे उमेदवार माजी आमदार मोहन मते आणि कॉंग्रेसचे उमेदवार गिरीश पांडव यांच्यात मुख्य लढत असली तरी बंडखोर आणि अपक्षांमुळे सत्ताधाऱ्यांची डोकेदुखी वाढली होती. अटीतटीच्या या सामन्यात भाजपचे मोहन मते यांनी बाजी मारली.
दक्षिणेत अटीतटीच्या लढतीत जनतेने मोहन यांनाच दिली 'मते'

नागपूर : अतिशय अटीतटीच्या मानल्या जाणाऱ्या दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे मोहन मते 2800 मतांनी निवडून आले. तीन बंडखोरांमुळे दक्षिण नागपूरची लढत सर्वाधिक चुरशीची झाली होते. येथे भाजपचे उमेदवार माजी आमदार मोहन मते आणि कॉंग्रेसचे उमेदवार गिरीश पांडव यांच्यात मुख्य लढत असली तरी बंडखोर आणि अपक्षांमुळे सत्ताधाऱ्यांची डोकेदुखी वाढली होती. अटीतटीच्या या सामन्यात भाजपचे मोहन मते यांनी बाजी मारली.

शिवसेनेच्या किशोर कुमेरिया यांनी बंडाचा भगवा फडकावला होता. दुसरीकडे कॉंग्रेसचे प्रमोद मानमोडे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करून सर्वस्व पणाला लावले. माजी उपमहापौर भाजपचे नगरसेवक सतीश होले यांनीही निवडणुकीत उडी घेतली.

भाजपने येथील विद्यमान आमदार सुधाकर कोहळे यांचे तिकीट कापले. शिवसेनेसाठी जागा सोडली नसल्याने माजी उपमहापौर किशोर कुमेरिया हेसुद्धा नाराज होते. याचा फटका मते यांना बसण्याची शक्‍यता होती. मात्र, नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेनंतर वातावरण बदलले.

कार्यकर्त्यांची फौज, भाजपचे नेटवर्क याचा फायदा मते यांना झाला. गिरीश पांडव यांची सर्व मदार कॉंग्रेसच्या पारंपरिक मतांवर होती. परंतु मतविभाजनाचा फटका त्यांना बसला. सतीश होले भाजपचे बंडखोर असले तरी ते कॉंग्रेसच्याच मतांवर त्यांनी डल्ला मारल्याचे दिसून येते. एकूणच दक्षिणेत अटीतटीचा सामना झाला. यात मोहन मतेंचा विजय झाला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com