दक्षिण नागपूरला टॅंकरमुक्त करणार: मोहन मते

"चोवीस बाय सात' पाणी उपलब्ध करणार.
दक्षिण नागपूरला टॅंकरमुक्त करणार: मोहन मते

नागपूर : दक्षिण नागपुरातील पाण्याची समस्या कायमस्वरूपी संपवून या भागात "चोवीस बाय सात' पाणी उपलब्ध व्हावे आणि दक्षिण नागपूर टॅंकरमुक्त करावे हा दृढनिश्‍चय असल्याचे प्रतिपादन दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्ष, शिवसेना महायुतीचे उमेदवार मोहन मते यांनी आज केले.

दक्षिण नागपुरातील तुकडोजी पुतळ्यापासून प्रारंभ झालेल्या प्रचार रॅलीच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, दक्षिण नागपुरात राहणाऱ्या तळागाळातील माणसाला अत्यावश्‍यक सुविधा प्राप्त व्हाव्यात, या भागातील ज्येष्ठ नागरिकांना सन्मान प्राप्त करून देण्यासाठी उद्यानांमध्ये विरंगुळा केंद्र आणि हेल्पिंग सेंटर उभारण्याचा मानस आहे. मतदारसंघातील रस्ते विकास प्राधान्याने करून नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी जनता दरबाराच्या माध्यमातून थेट संवाद साधण्याचे आश्‍वासनही मोहन मते यांनी आज दिले.  

भारतीय जनता पक्षाचे शेकडो कार्यकर्ते या पदयात्रेत सहभागी झाले होते. यांच्यासोबत शिवसेनेचे नेते शेखर सावरबांधे, नगरसेवक डॉ. रवींद्र भोयर, नगरसेविका उषा पालेट, नगरसेविका कामडी, भाजपचे जनसंपर्क प्रमुख देवेन दस्तुरे, अध्यक्ष संजय ठाकरे, महामंत्री विलास करांगळे, मंगला म्हस्के, प्रशांत कामडी, सुनील मानेकर, नानाभाऊ आदेवार यांच्यासह भाजपचे व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com