मतेंसारखा धडाडीचा आमदार निवडा - ऍड. सुलेखा कुंभारे

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विकासाचा अजेंडा पूर्ण करायचा असेल तर पुन्हा महायुतीचे सरकर यायलाच हवे. दक्षिण नागपूर मतदारसंघात मोहन मते यांच्यासारखा कर्तबगार आणि धडाडीचा लोकनेता उमेदवार म्हणून भाजपने दिला. त्यांना विक्रमी मतांनी विजयी करण्याची जबाबदारी सर्वांनी स्वीकारावी, असे आवाहन बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या अध्यक्ष माजी मंत्री ऍड. सुलेखा कुंभारे यांनी केले.
मतेंसारखा धडाडीचा आमदार निवडा - ऍड. सुलेखा कुंभारे

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विकासाचा अजेंडा पूर्ण करायचा असेल तर पुन्हा महायुतीचे सरकर यायलाच हवे. दक्षिण नागपूर मतदारसंघात मोहन मते यांच्यासारखा कर्तबगार आणि धडाडीचा लोकनेता उमेदवार म्हणून भाजपने दिला. त्यांना विक्रमी मतांनी विजयी करण्याची जबाबदारी सर्वांनी स्वीकारावी, असे आवाहन बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या अध्यक्ष माजी मंत्री ऍड. सुलेखा कुंभारे यांनी केले.

भाजपचे दक्षिण नागपुरातील उमेदवार मोहन मते यांच्या प्रचारार्थ प्रभाग 17 मध्ये आयोजित प्रचार रॅलीच्या शुभारंभप्रसंगी त्या बोलत होत्या. ऍड. कुंभारे म्हणाल्या, भाजप आणि शिवसेनेने वंचितांच्या प्रश्‍नांकडे प्रामाणिकपणे लक्ष दिले. सर्वोच्च स्तरावर नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस या नेत्यांनी समाजाची सेवा केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न कुणी खऱ्या अर्थाने पूर्ण करत असेल तर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. त्यामुळे नागपुरातील जनतेने भाजप उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, असेही आवाहन कुंभारे यांनी केले.

राजाबक्षा येथून शेकडो कार्यकर्त्यांसह मोहन मते यांच्या प्रचार रॅलीला प्रारंभ झाला. वंजारीनगर, विश्वकर्मानगर, चंद्रमणीनगर, जोशीवाडीमार्गे प्रचार रॅली पुढे जात असताना विविध ठिकाणी मोहन मते यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी नगरसेविका लता काटगाये, नगरसेवक विजय चुटेले, भाजपचे महामंत्री प्रशांत कामडी, सुनील मानेकर, जनसंपर्कप्रमुख देवेन दस्तुरे, प्रभागाचे अध्यक्ष मनीष फाये, अंगद जरुळरकर, सीमा यादव, सुनंदा मानमोडे, राजू मून, रोहन आग्रे, किशोर खराबे, प्रवीण शर्मा यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com