पंतप्रधान मोदींची वर्ध्यातील सभा फ्लाॅप की हिट?

पंतप्रधान मोदींची वर्ध्यातील सभा फ्लाॅप की हिट?

पुणे  : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 2019 च्या लोकसभा निवडणुकीनिमित्त महाराष्ट्रातील पहिला सभा हिट गेली की फ्लाॅप झाली, यावर आता सोशल मिडियात युद्ध रंगले आहे. लोक मोदींच्या भाषणबाजीला कंटाळल्याने सभेला गर्दी कमी असल्याचा दावा विरोधकांनी केला. तर भाजपने सभा जोरदार झाल्याचा प्रतिवाद केला. 

मोदींच्या रॅलीचे दोन दृश्ये सोशल मिडियात व्हारयल झाली आहेत. ती दोन्ही ड्रोन कॅमेऱ्याने टिपली आहेत. एका फोटोत पुढील  भागात गर्दी दिसत आहे. दुसऱ्या फोटोत मैदान रिकामे आहे. मोदी यांच्या सभेचे कमी गर्दीचे व्हिडीओ सोशल मिडियात शेअर झाले आहेत. 

वर्धा येथील स्वावलंबी महाविद्यालयाच्या मैदानावर ही सभा झाली. 2014 च्या लोकसभा निवडणुकीतही येथे सभा झाली होती. मोदी या वेळी येथे 30 मिनिटे बोलले. शरद पवार, अजित पवार, सुशीलकुमार शिंदे या ने्त्यांवर त्यांनी टीका केली. या टिकेपेक्षा मोदींच्या सभेला गर्दी किती यावर चर्चा अधिक रंगली. मोदींच्या सभांना कमी प्रतिसाद म्हणजे भाजपची हवा ओसरत असल्याचा दावा विरोधकांनी केला आहे.

स्थानिक माहितीनुसार हे मैदान निम्मेच भरले होते. गेल्या सभेच्या वेळी ते पूर्ण क्षमतेने भरून गेले होते. मोदींनी ट्विट केलेल्या सभेच्या दृश्यात व्यासपीठासमोरील गर्दीचे चित्रण आहे.  

विधानसभेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेही यांनीही या गर्दीवरून भाजपला टोला लगावला आहे. 

मोदींच्या सभेच्या वेळी गर्दीने फुल भरलेले मैदान दिसले नसल्याने भाजपच्या स्थानिक नेत्यांत चिंता असली तरी वाढत्या तापमानामुळे लोक गेल्या सभेपेक्षा कमी आले असावेत, असा त्यांचा सूर आहे.

हा तापमानाचा परिणाम नसून मोदी लाट ओसरल्याचा हा परिणाम असल्याचा प्रतिवाद दुसरीकडे आहे.   

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com