Modi's debt forgiveness of capitalist friends | Sarkarnama

भांडवलदार मित्रांचे मोदींकडून कर्ज माफ 

वृत्तसंस्था
रविवार, 23 फेब्रुवारी 2020

नवी दिल्ली : उद्योगपतींचे कर्ज माफ करण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयावर आज कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी टीका करत ‘मोदीजींचे भांडवलदार मित्र’ अशा शब्दात उल्लेख केला आहे. भाजप सरकारने मोदी यांच्या भांडवलदार, उद्योगपती मित्रांचे ८ लाख कोटींचे कर्ज माफ केले आहे. 

काळा पैसा बाळगणाऱ्या लोकांचे नाव जाहीर करू, असा दावा मोदी सरकार कोणत्या आधारावर करत आहे. या निर्णयातून त्या लोकांची नावे लपविण्याचा प्रयत्न केला जात आहे काय? कर्ज माफ करण्याची प्रक्रिया काय आहे, असे प्रश्‍न प्रियांका गांधी यांनी विचारले आहेत.

देशातील शेतकरी कर्जाच्या बोजाखाली दबलेले असताना श्रीमंत मित्रांना कर्जमाफीसाठी कोणते धोरण राबविले जात आहे. या प्रश्‍नांची उत्तरे सरकारला द्यावीच लागेल आणि त्यापासून पळता येणार नाही. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख