modi walks in vajapeyi funeral procession | Sarkarnama

देशाचे पंतप्रधान पहिल्यांदाच अंत्ययात्रेत पायी चालले : मोदींच्या गुरूभक्तीची चर्चा

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

नवी दिल्ली : देशाचा पंतप्रधान एका माजी पंतप्रधानांच्या अंत्ययात्रेत पूर्णवेळ सहभागी झाल्याची घटना आज पहिल्यांदाच अनुभवास आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींच्या अंत्ययात्रेत भाजप मुख्यालयापासून ते अंत्यसंस्काराच्या राष्ट्रीय स्मृती स्थळापर्यंत मोदी सहभागी झाले.

नवी दिल्ली : देशाचा पंतप्रधान एका माजी पंतप्रधानांच्या अंत्ययात्रेत पूर्णवेळ सहभागी झाल्याची घटना आज पहिल्यांदाच अनुभवास आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींच्या अंत्ययात्रेत भाजप मुख्यालयापासून ते अंत्यसंस्काराच्या राष्ट्रीय स्मृती स्थळापर्यंत मोदी सहभागी झाले.

हे अंतर सहा किलोमीटर होते. मोदी यांनी आपली गुरूभक्ती या निमित्ताने दाखवली. वाजपेयी हे एम्समध्ये रुग्णालयात असताना मोदी हे दोन-तीन वेळा त्यांची भेट घेण्यास गेले. अंत्यसंस्काराच्या नियोजनात त्यांनी लक्ष घातले. वाजपेयी यांच्याबद्दलच्या आपल्या भावना त्यांनी उत्कट शब्दांत व्यक्त केल्या होत्या. अतिशय धीरगंभीर चेहऱ्याने मोदी हे गेले दोन दिवस वावरत होते.

वाजपेयी यांच्या पार्थिवाचे दर्शन त्यांनी रुग्णालयात जाऊन घेतले. पुन्हा ते वाजपेयी यांच्या घरी गेले. वाजपेयी यांचे पार्थिव भाजप मुख्यालयात आणले. तेव्हाही मोदी तेथे हजर होते. अंत्ययात्रा तेथून निघाल्यानंतर ते राष्ट्रीय स्मृती स्थळापर्यंत अंत्ययात्रेत पायी सहभागी झाले. खुद्द मोदीच पायी जात असल्यान भाजपच्या अनेक नेत्यांनीही मग या यात्रेत पायी चालू लागले. यात भाजपचे अध्यक्ष अमित शहा हे मोदींच्या सोबतीने चालत होते. त्यांच्यामागे मंत्रिमंडळातील त्यांचे इतर सहभागी झाले होते. दुपारी एक वाजता अंत्ययात्रेला सुरवात झाली. या यात्रेला मोठी गर्दी असल्याने ती स्मृती स्थळी पोचण्यासाठी चार तास लागू शकतात.

देशाचे पंतप्रधान हे एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तिचे निधन झाल्यानंतर त्यांच्याप्रति श्रद्धांजली अर्पण करतात. अतिमहत्त्वाच्या व्यक्तिंचे निधन  झाले तर त्यांच्या पार्थिवाचे दर्शन पंतप्रधान घेतात. फारच जवळची आणि अतिमहत्त्वाची व्यक्ती असेल तर अंत्यसंस्काराला उपस्थित राहतात. मात्र मोदी हे रुग्णालयापासून ते अंत्यंसंस्काराच्या ठिकाणापर्यंत वाजपेयी यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत सोबत राहिले. 

वाचा संबंधित बातम्या- वाजपेयींच्या श्रद्धांजली सभेला विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला चपलेने मारले

उद्धव ठाकरेंनी मोदी, शहांसोबत जागविल्या अटलजींच्या आठवणी; सेना प्रमुख भाजप मुख्यालयात

अटलजी  सरळ स्वभावाचे, निष्कपट राजकारणी : उध्दव ठाकरे

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख