'खरं बोला मोदी..' ही आमची ट्वीटर 'टॅगलाईन' - प्रणिती शिंदे - Modi Tell The Truth Is Our Twitter Tagline Says Praniti Shinde | Politics Marathi News - Sarkarnama

'खरं बोला मोदी..' ही आमची ट्वीटर 'टॅगलाईन' - प्रणिती शिंदे

विजयकुमार सोनवणे
बुधवार, 9 मे 2018

''मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केलेल्या कामाची पावती म्हणून कर्नाटकमध्ये पुन्हा काँग्रेसची सत्ता येईल. मात्र विधीमंडळ त्रिशंकू होईल असा भाजपचे लोक जाणीवपूर्वक
खोटा प्रचार करीत आहेत. खरं बोला मोदी अशी आमची ट्विटरवर टॅगलाईन आहे. काँग्रेसला मिळणारा प्रतिसाद पाहता मोदींच्या पायाखालची जमिन सरकली आहे. त्यामुळेते काहीही बोलत आहेत, अगदी खालच्या पातळीवर जाऊन प्रचार करीत आहेत,'' असा आरोप आमदार प्रणिती शिंदे यांनी आज (बुधवार) 'सकाळ' शी बोलताना केला.

सोलापूर : ''मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केलेल्या कामाची पावती म्हणून कर्नाटकमध्ये पुन्हा काँग्रेसची सत्ता येईल. मात्र विधीमंडळ त्रिशंकू होईल असा भाजपचे लोक जाणीवपूर्वक
खोटा प्रचार करीत आहेत. खरं बोला मोदी अशी आमची ट्विटरवर टॅगलाईन आहे. काँग्रेसला मिळणारा प्रतिसाद पाहता मोदींच्या पायाखालची जमिन सरकली आहे. त्यामुळे
ते काहीही बोलत आहेत, अगदी खालच्या पातळीवर जाऊन प्रचार करीत आहेत,'' असा आरोप आमदार प्रणिती शिंदे यांनी आज (बुधवार) 'सकाळ' शी बोलताना केला.

आमदार शिंदे यांच्याकडे बागलकोट जिल्ह्याची जबाबदारी आहे. तेथील प्रचार आणि एकूणच कर्नाटक राज्यातील रणधुमाळीचा अनुभव त्यांनी कथन केला. त्या म्हणाल्या ''काल सोनिया गांधी यांची जाहीर सभा झाली. त्या सभेला एक लाख मतदार उपस्थित होते. सभेच्या तयारीसाठी एम. बी. पाटील यांना फक्त 48 तासांचा अवधी होता. या उलट मोदींच्या सभेसाठी महिन्यापासून तयारी सुरु होती. मात्र मोदींच्या सभेला प्रतिसाद मिळाला नाही. कर्नाटकची जनता ठामपणे सिद्धारामय्या यांच्या पाठिशी आहे. कारण त्यांनी कामेच त्या पद्धतीने केली आहेत. संघटनाही तितकीच मजबूत आहे. त्यामुळे मतदारांचा कल कांग्रेसकडे असल्याचे दिसून येईल."

"प्रचार करताना भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून फार हीन पातळीचा वापर केला जात आहे. त्याच शब्दांत त्यांच्याबद्दल बोलणे ही आमची संस्कृती नाही. त्यांचे मंत्रीही खालच्या पातळीवर जाऊन बोलत आहेत. त्यांच्याकडूनही बोलताना चुका होत आहेत. एका ठिकाणी सुमारे दहा हजार मतदान अोळखपत्रे सापडली. आता 'बूथ कॅप्चरींग' करणे, मतदान यंत्रात बिघाड करण्यासह साम-दाम-दंड-भेदचा वापर करत सत्ता मिळवण्यासाठी कोणत्याही थराला भाजपचे नेते जाण्याची शक्यता आहे.'' असे प्रणिती शिंदे यांनी सांगितले. माझ्याकडे बागलकोट जिल्ह्याची जबाबदारी आहे. त्या ठिकाणी सहा आमदार आहेत. प्रचारादरम्यान मतदारांचा कौल घेतला. त्यावेळी, काँग्रेसने खूप चांगले काम केले आहे. त्यामुळे आम्ही काँग्रेसच्याच पाठिशी राहणार असल्याचे मतदारांनी सांगितल्याचेही आमदार शिंदे म्हणाल्या.

"कर्नाटकमधील निवडणूक ही आगामी लोकसभेची रंगीत तालीमच म्हणावे लागेल. त्या ठिकाणी काय निर्णय लागतो, त्यावर आगामी लोकसभेचे भवितव्य असणार आहे. गुजरातमध्ये भाजपला दणका बसला आहे, त्यामुळे कर्नाटकमध्ये कोणत्याही स्थितीत सत्ता मिळवण्यासाठी भाजपचे नेते काहीही करायला तयार आहेत. त्यामुळेच आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांची ही रंगीत तालीम आहे,'' असाही दावा आमदार शिंदे यांनी केला.

काँग्रेसचे अध्य़क्ष राहुल गांधी यांच्या जनयात्रेला जितका प्रतिसाद मिळाला तितका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नाही. राहुलजी यांचा संकल्प आणि सिद्धरामय्या यांच्या धोरणावर विश्वास ठेवून कर्नाटकचे मतदार कांग्रेसला कौल देतील व काँग्रेसच सत्तेवर येईल

- प्रणिती शिंदे, आमदार

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख