`लव्ह लेटर` पाठविणे बंद करून मोदींनी विमाने पाठविली....`

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानबाबत आक्रमक धोरण स्वीकारले आहे. पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यानंतर बारा दिवसांतच पाकिस्तानला त्यांच्याच भाषेत उत्तर दिले.
`लव्ह लेटर` पाठविणे बंद करून मोदींनी विमाने पाठविली....`

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानला `लव्ह लेटर` पाठविणे बंद करून थेट एअरफोर्स पाठवून पाकिस्तानला योग्य तो संदेश दिल्याच्या प्रतिक्रिया सोशल मिडियात उमटत आहेत. 

मोदी यांच्या आधीचे पंतप्रधान मनमोहनसिंग हे पाकिस्तानाला लव्ह लेटर पाठवत असल्याची टीका त्यांनी केली होती. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर मनमोहनसिंग सरकार हे पाकिस्तानला त्यांच्याच भाषेत उत्तर देत नसल्याची टीका केली होती. उलट हे सरकार लव्ह लेटर पाठवत आहे, असे एका मुलाखतीत मोदींनी सांगितले होते.

तुम्ही पंतप्रधान झाल्यानंतर पाकिस्तानशी कसे वागाल, या प्रश्नावर मोदींनी पाकिस्तानला त्यांच्या भाषेत उत्तर देईल, हे दोन-तीनदा सांगितले होते. पाकिस्तानवर कारवाई करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दबावाची काळजी करण्याचे कारण नाही. उलट  शंभर कोटींचा भारत इतर देशांवर आपल्या हितासाठी आंतरराष्ट्रीय दबाव टाकू शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले होते. या विधानाला तेव्हा मोठ्या टाळ्या मिळाल्या होत्या. हा व्हिडीओ आता पुन्हा व्हायरल झाला आहे. 

मोदी हे 2014 मध्ये पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांना शपथविधीसाठी बोलविले होते. तसेच मोदी हे शरीफ यांच्या नातीच्या मुलीसाठी इस्लामाबादला अचानक गेले होते.

मात्र पठाणकोट आणि उरी येथील दहशतवादी ह्ल्ल्यानंतर मोदी यांनी आपले पाकिस्तानबाबतचे मवाळ धोरण बदलले. उरी येथील हल्ल्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या पलिकडे असलेल्या दहशतवादी तळांवर सर्जिकल स्ट्राईक केला. बारा दिवसांपूर्वी पुलवामा येथील हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली. त्यामुळे सरकारने लव्ह लेटर बंद करून थेट विमाने पाठविली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com