Modi in Nagpur for Ambedkar birth anniversary? | Sarkarnama

आंबेडकर जयंतीला मोदी दीक्षाभूमीवर ? 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 5 एप्रिल 2017

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त (ता. 14) होणाऱ्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपुरातील दीक्षाभूमीवर उपस्थित राहणार आहेत. 

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त (ता. 14) होणाऱ्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपुरातील दीक्षाभूमीवर उपस्थित राहणार आहेत. 

दीक्षाभूमीवर अद्यापपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हजेरी लावलेली नाही. या वर्षी डॉ. आंबेडकर जयंतीला नरेंद्र मोदी आदरांजली वाहणार असल्याचे भाजपच्या सूत्रांनी सांगितले. पंतप्रधानांच्या नागपूर दौऱ्याची अधिकृत माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाला अद्याप आलेली नाही. भाजपचे कार्यकर्ते मात्र कामाला लागले आहेत. महापालिका निवडणुकीत भाजपला नागपुरात चांगले यश मिळाले आहे. या यशामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. या वेळी नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा आयोजित केली जाणार आहे. 

पंतप्रधान दीक्षाभूमीवर आदरांजली वाहिल्यानंतर कोराडी येथील नव्याने उभारलेल्या वीज निर्मिती युनिटचे लोकार्पण त्यांच्या हस्ते होणार आहे. अडीच वर्षांपूर्वी पंतप्रधान नागपुरात आले होते. त्या वेळी मेट्रो रेल्वेचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते झाले होते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख