मोदी आतापर्यंतचे सर्वाधिक शेतकरीविरोधी पंतप्रधान : योगेंद्र यादव 

मोदी आतापर्यंतचे सर्वाधिक शेतकरीविरोधी पंतप्रधान : योगेंद्र यादव 

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने गेल्या चार वर्षांत शेतकऱ्यांचे नावही काढले नाही. आता मात्र शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबविल्या जातील. मात्र, यातील काहीही करून उपयोग होणार नाही. कारण हे सरकार आतापर्यंतचे सर्वाधिक शेतकरीविरोधी सरकार आहे, असे मत स्वराज इंडिया पक्षाचे अध्यक्ष योगेंद्र यादव यांनी पुण्यात बोलताना सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील आतापर्यंतचे सर्वाधिक शेतकरीविरोधी पंतप्रधान आहेत, अशी टीका त्यांनी केली. 

या सरकारला खाली खेचायचा निर्णय देशातील शेतकऱ्यांनी यापूर्वीच केला आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड व राजस्थान या राज्यांच्या निकालातून हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सरकारने काहीही सवलती दिल्या तरी शेतकरी सरकारच्या विरोधात जाणार हे नक्की, असे यादव यांनी स्पष्ट केले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनासाठी यादव पुण्यात आले आहेत. यावेळी बोलताना त्यांनी ऊस दर आणि थकित ऊस बिलाबाबत नाराजी व्यक्त केली. महाराष्ट्राकडे देशभरातील शेतकरी आणि आमच्यासारखे कार्यकर्ते आदर्श म्हणून पाहतात. जर महाराष्ट्रात ऊसाची थकबाकी पाच हजार कोटी रूपये असेल तर इतरांनी काय करायचे, असा असा प्रश्न पडतो. उत्तर प्रदेशातील कारखान्यांकडे सहा हजार कोटी रूपये थकित असल्याची माहिती त्यांनी दिली.

ते म्हणाले, "शेतकऱ्यांना कर्जमाफी नको तर कायमस्वरूपी कर्जमुक्ती हवी आहे. शेतकऱ्याला कर्ज होणार नाही, अशा प्रकारची व्यवस्था निर्माण करण्याची जबाबदारी सरकारची आहे. सहा वर्षात शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे स्वप्न दाखविण्यात आले आहे. सरकारचा प्रयत्न चांगला आहे. त्यास विरोध करण्याचे कारण नाही. मात्र, सहापैकी पहिल्या तीन वर्षात किती वाढले याची आकडेवारी जाहीर करण्याची हिंम्मत सरकारमध्ये आहे का? पहिल्या तीन वर्षात पाच टक्के उत्पन्नदेखील सरकार वाढवू शकले नाही, ही वस्तुस्थिती आहे.''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com