मोदींनी केले दिवे लावण्याचे आवाहन, "" सदाभाऊ म्हणतात, मशाली पेटवा ! ''

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला आदेश आम्ही ऐकणार.आम्ही मशाली पेटवणार आणि कोरोनाला हरवणार असे त्यांनी सांगितले.
मोदींनी केले दिवे लावण्याचे आवाहन, "" सदाभाऊ म्हणतात, मशाली पेटवा ! ''

पुणे-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच तारखेला रात्री 9 वाजता लोकांना दिवे लावण्याचे आवाहन केले आहे मात्र आमदार सदाभाऊ खोत यांनी त्यांच्या संघटनेतील कार्यकर्त्यांना मशाली पेटवा असे आदेश दिले आहेत.मशाली पेटवून कोरोनोला आपण हरवायच आहे.'असे त्यांनी म्हटले आहे. 

आज रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील लोकांना घरातील दिवे बंद करून दिवा,मेणबत्ती,टॉर्च लावण्याचे आवाहन केले आहे. सदाभाऊ खोत यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना "होय आम्ही माननीय नरेंद्र मोदी यांचा आदेश पाळणार आणि पाच तारखेला रात्री नऊ वाजता घरात मशाली पेटवणार आणि कोरोनाला हरवणार"असे आवाहन करणारा संदेश पाठवला आहे. 

याबाबत सदाभाऊ खोत यांच्याशी संपर्क केला असता त्यांनीही या वृत्तास दुजोरा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला आदेश आम्ही ऐकणार.आम्ही मशाली पेटवणार आणि कोरोनाला हरवणार असे त्यांनी सांगितले. 

रयत क्रांती संघटनेचे सर्व कार्यकर्ते आज आपआपल्या घरात मशाली पेटवणार असल्याचेही खोत म्हणाले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com