संरक्षणमंत्री राजनाथसिंहांनी `झूम`वर मिटिंग घेतली आणि मोदी सरकार खडबडून जागे झाले....

केंद्रीय गृह मंत्रालयाने झूम मिटिंग प्लॅटफॉर्मवापरण्यास सरकारी अधिकाऱ्यांना बंदी केली आहे. हे अॅपसरकारी कामासाठी नाही, असे गृह मंत्रालयाने काढलेल्या सूचनावलीत स्पष्ट करण्यात आले आहे.
RM-on-zoom-ff.
RM-on-zoom-ff.

नवी दिल्ली : केंद्रीय गृह मंत्रालयाने झूम मिटिंग प्लॅटफॉर्म वापरण्यास सरकारी अधिकाऱ्यांना बंदी केली आहे. हे अॅप सरकारी कामासाठी नाही, असे गृह मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. खुद्द संरक्षणमंत्री राजनाथसिंह हे चीफ आॅफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत यांच्याशी `झूम`वर चर्चा करत असल्याचे छायाचित्र प्रसिद्ध झाल्यानंतर गृह विभागाने याबाबत सूचना जारी केली आहे.

राष्ट्रीय माहिती केंद्राने (एनआयसी) तयार केलेल्या Vidyo या अॅपचा वापर करावा, असे सांगण्यात आले आहे. कोरोनाच्या संकटात अनेक सरकारी अधिकारी झूम या अमेरिकन कंपनीचे अॅप व्हर्च्युअल मिटींगसाठी वापर करू लागले आहेत. अनेक वरिष्ठ अधिकारी त्याचा उपयोग करत आहेत. त्या सर्वांना Vidyo चा वापर करण्यास सांगण्यात आले आहे. हे अॅप 2009 मध्ये डेस्कटाॅप बेस व्हिडीओ काॅन्फरन्सिंगसाठी वापरण्यात येत होते. त्याकडे दुर्लक्ष होऊन सरकारी कामांतही झूमचा वापर वाढला होता. त्यानंतर केंद्र सरकारने सूचना देऊन Vidyo हे सरकारी कामांसाठी वापरण्याचे सक्तीचे केले

कोरोनाच्या संकटानंतर Vidyo अॅपवर 24 मार्च ते नऊ एप्रिल या लाॅकडाऊच्या काळात 79405 काॅल्स करण्यात आले असून 37909 तास त्याचा वापर करण्यात आल्याचे NIC ने म्हटले आहे. 

झूमच्या वापरानंतर गोपनीय माहितीला असलेला धोका एक एप्रिल रोजी लक्षात आला. याच दिवशी संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी आपण झूमवर मिटिंग केल्याचे छायाचित्र ट्विटरवर शेअर केले होते. राजनाथसिंह यांच्यासोबत सीओडी बिपीन रावत यांच्यासह अनेक लष्करी अधिकारी हे  व्हिडीओ काॅन्फरन्सिंगवर होते. 

कोरोनाच्या संकटानंतर खासगी आणि सरकारी कामांत झूमची लोकप्रियता वाढली. मात्र त्याबाबत अनेक सुऱक्षाविषयत चिंता पुढे आल्या. सिंगापूर, अमेरिका आणि जर्मनी येथील सरकारी अधिकाऱ्यांना हे अॅप वापरण्यास बंदी आहे. झूमवरील काॅन्फरन्समध्ये हॅकर्सच्या हल्ल्यात डाटा चोरीला जाण्याचा धोका व्यक्त करण्यात आला. गुगल कंपनीनेही आठ एप्रिलपासून त्यांच्या कर्मचाऱ्यांना झूम वापरास बंदी घातली. 

NICने विकसित केलेल्या Vidyo अॅपवरील संभाषण सुरक्षित असून त्यावरील माहिती सरकारी सर्व्हरमध्ये सुरक्षित ठेवण्यात आल्याचे NIC च्या संचालिका नीता वर्मा यांनी सांगितले. NIC च्या डाटा सेंटरवर हे अॅप होस्ट करण्यात आले आणि ते end to end encrypted नसल्याचे त्यांनी `हिंदुस्थान टाइम्स`ला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले होते.   

या साऱ्या प्रकारानंतर झूम मिटिंग प्लॅटफॉर्मच्या सुरक्षित वापराबाबत वैयक्तिक वापरकर्त्यांसाठी केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सायबर समन्वय केंद्राने सूचना जारी केल्या आहेत. खासगी वापरासाठी अद्यापही या मंचाचा वापर करणाऱ्यांनी काय खबरदारी घ्यावी, यासाठीही  मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली आहेत. ती खालीलप्रमाणे

The Cyber Coordination Centre (CyCord), under the Union Ministry of Home Affairs (MHA), has issued an advisory on secure use of ZOOM Meeting Platform by private individuals. This advisory states that the platform is not for use by Government officers/officials for official purposes.

The document makes reference to earlier advisories of the Indian Computer Emergency Response Team(Cert-In) and states that Zoom is not a safe platform. The guidelines have been issued to safeguard private individuals who would still like to use the platform for private purposes.

The broad objective of this advisory is to prevent any unauthorized entry into a Zoom Conference Room and  prevent the unauthorized participant to carry out malicious attacks on the terminals of other users in the conference.

झूम कॉन्फरन्स रूममधे अनधिकृत प्रवेश रोखण्यासाठी आणि या कॉन्फरन्स मधे सहभागी होणाºया  व्यक्तींच्या टर्मिनलवर अनधिकृत सहभागी व्यक्तीकडून सायबर हल्ले रोखण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे

Advisory on Secure use of Zoom meeting platform by private individuals (not for use by government offices/officials for official purpose)

Zoom is a not a safe platform and advisory of cert-in on the same dated Feb 06, 2020 and March 30, 2020 may kindly be referred. These advisories are available on Cert-In website.

2. Those private individuals who still would like to use Zoom for private purpose may kindly follow the following guidelines

3. Broad objective of this document is to enable/disable certain settings is to:

-prevent unauthorised entry in the conference room  prevent an authorised participant to carry out malicious on the terminals of other in the conference.

- Avoid DOS attack by restricting users through passwords and access grant. 4. Most of the settings can be done by login into users zoom account at website, or installed application at PC/Laptop/Phone and also during conduct of conference. However certain settings are possible through certain mode/channel only. For example, lock meeting can be enabled by administrator only when the meeting has started. This documents explains in details all the security configuration through website, App and through console during the conduct of conference

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com