modi gevernment afraid sp bsp mayawati | Sarkarnama

सप-बसप आघाडीला मोदी सरकार घाबरले, मायावतींचा हल्लाबोल 

वृत्तसंस्था
मंगळवार, 12 फेब्रुवारी 2019

लखनौ : केंद्रातील मोदी आणि यूपीतील योगी सरकारने सपा आणि बसप आघाडीचा धसका घेतला असून भाजप सरकार आमच्या आघाडीला घाबरत असल्याचा हल्लाबोल माजी मुख्यमंत्री मायावती यांनी आज केला. 

माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव हे एका विद्यार्थी नेत्यांच्या शपथविधी समारंभाला उपस्थित राहण्यासाठी निघाले असताना त्यांचे विमान रोखण्यात आले. याबाबत स्वत: यादव यांनी ट्‌विट केले आहे. या घटनेचा सपा आणि बसपच्या नेत्या आणि कार्यकर्त्यांनी निषेध केला आहे. मायावती यांनी तर मोदी सरकारवर कडाडून टीका केली.

ते म्हणाले, भाजप सरकार लोकशाही विरोधी धोरणांचा अवलंब करीत आहे. प्रत्येक स्तरावर लोकशाही विरोधी पाऊल उचलले जात आहे हे दुर्दैवी आहे. केंद्र आणि राज्य सरकार आमच्या आघाडीला घाबरत आहे. 

दरम्यान, अखिलेश यादव म्हणाले, की चौधरी चरणसिंह आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपण्यास थांबविण्यात आले. मी अलाहाबाद येथे जात असताना पोलिसांनी काही कारण नसताना मला रोखले आहे. त्याचा मी निषेध करतो. 

दरम्यान, राज्यातील सपा कार्यकर्त्यांनी राज्य सरकारचा निषेध करीत अनेक ठिकाणी आंदोलन केले. 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख