Modi on ayodhya verdict | Sarkarnama

या, एक नवी सुरवात करूया - मोदी

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना उद्देशून भाषण करताना `या, एक नवी सुरवात करूया' असे आवाहन केले.

पुणे - अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना उद्देशून भाषण करताना `या, एक नवी सुरवात करूया' असे आवाहन केले.

न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करून पंतप्रधान मोदी म्हणाले, की या, एक नवी सुरवात करू; नवा भारत निर्माण करू. सर्वांना सोबत घेऊन सर्वांचा विकास करीत सर्वांचा विश्वास मिळवत पुढे जायचे आहे. राम मंदिर निर्माण करण्याचा निर्णय न्यायालयाने दिला आहे. आता राष्ट्र निर्माणाची जबाबदारी सर्वांवर आहे.

भारतासमोर आव्हाने आहेत. मात्र, भविष्यातील भारताचे लक्ष्य गाठण्यासाठी पुढे जाण्याचा संकल्प करुया, असेही त्यांनी नमूद केले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख