दोन खासदारांचा भाजप तीनशेवर का पोहोचला? : पंतप्रधानांनीच दिले उत्तर

कोरोनाव्हायरसविरुध्दच्या लढाईसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यकर्त्यांना पाच संकल्प मंत्र दिले आहेत. या लढाईसाठी गरीबांसाठी काम करण्यासाठी सज्ज राहावे असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. कोरोना व्हायरसविरुध्दच्या लढाईत साथ दिलेल्यांना पंतप्रधानांनी नमन केले आहे.
modi-1
modi-1

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसविरुध्दच्या लढाईसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यकर्त्यांना पाच संकल्प मंत्र दिले आहेत. या लढाईसाठी गरीबांसाठी काम करण्यासाठी सज्ज राहावे असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. या व्हायरसविरुध्दच्या लढाईत साथ दिलेल्यांना पंतप्रधानांनी नमन केले आहे.

भारतीय जनता पक्षाचा सोमवारी चाळीसावा वर्धापनदिन आहे. या निमित्ताने पंतप्रधानांनी व्हिडीओद्वारे कार्यकर्त्यांशी संवाद साधला. पंतप्रधान म्हणाले, संपूर्ण जगावरच आज या व्हायरसचे संकट आले आहे. त्याग , तपस्या आणि बलिदान या तीन तत्त्वांवर भाजपा हा पक्ष उभा आहे  अशा परिस्थितीत भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी लढाईसाठी सज्ज राहावे. आपल्यावर सध्या मोठं संकट आलं आहे. तरीही आपण खंबीरपणे पुढे जात आहोत. भारत हा विकसनशील देश आहे. आपण एकीकडे गरीबीसारख्या मोठ्या प्रश्नाशीही लढत आहोत. तर दुसरीकडे कोरोना व्हायरसविरुध्दच्या  लढ्यात आपल्या प्रयत्नांची सर्व राष्ट्रांनी, जागतिक आरोग्य संघटनेनं प्रशंसा केली आहे. करोनाशी लढताना आपण सर्व देशांसमोर एक उत्तम उदाहरण आहे.

भाजपाच्या कार्यकर्त्यांना संकल्पमंत्र देताना ते म्हणाले,  गरिबांच्या रेशनसाठी अविरत सेवा अभियान राबवावे.  आपल्यासोबतच घरातल्या इतरांना मास्क द्या. धन्यवाद अभियान राबवा. आरोग्य सेतू अ‍ॅप डाउनलोड करायला लावा,  प्रत्येक भाजपा कार्यकत्यार्ने सहयोगी करावे, ४० लोकांकडून पीएम केअर्स फंडामध्ये दान करण्यास सांगा.

या लढ्यात ज्यांनी ज्यांनी साथ दिली त्या सर्वांना नमन करतो असे सांगुन ते म्हणाले, रविवारी दिवे लावण्याच्या करण्यात आलेल्या आवाहनालाही मोठा प्रतिसाद देत जनतेने सहभाग घेतला. प्रत्येक नागरिक आज स्वत:ला आणि देशाला वाचवण्यासाठी लढतोय. प्रत्येक भारतीय आज एकत्र, एकसंध आहे. ही मोठी लढाई आहे. यात आपल्याला जिंकायचे आहे. दोन खासदारांचा पक्ष आज ३०० खासदारांचा झाला हे कार्यकर्त्यांच्या कष्टाचे फळ आहे. कार्यकर्त्यांच्या त्याग, तपस्या आणि बलिदान यावरच भाजपा पक्ष उभा आहे, असेही ते म्हणाले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com