... प्रसंगी हरयाणवी ढंगात सुषमाजी अत्यंत कठोरही बोलत असत - नरेंद्र मोदी

 ... प्रसंगी हरयाणवी ढंगात सुषमाजी अत्यंत कठोरही बोलत असत - नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याबद्दल आतापर्यंत बऱ्याच जणांनी त्यांच्या प्रेमळ स्वभावाबद्दल सांगितले, त्यांच्यात ममता होती, त्या अतिशय प्रेमळ होत्या, हे सगळं तर त्यांच्याजवळ होतंच, पण एखादी चांगली गोष्ट घडवण्यासाठी वेळप्रसंगी त्या अत्यंत कठोर अशा शब्दांचाही वापर करत, त्यावेळी त्यांच्यात हरयाणवी ढंग दिसत असे, त्या फाडकन बोलत असत, मग त्यावेळी आपल्याबद्दल कोण काय म्हणेल ? याचाही त्या विचार करत नसत, पक्षाच्या हिताचे किंवा सहकाऱ्यांच्या हिताचे घडणार असेल तर त्या कठोर शब्द धाडकन वापरत असत अशी आठवण पंतप्रधआन नरेंद्र मोदी यांनी आज सांगितली. 

माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज्य यांना आदरांजली वाहण्यासाठी भरवलेल्या सभेत श्री. मोदी बोलत होत ते म्हणाले, त्या माझ्यापेक्षा वयाने लहान होत्या पण मला त्यांच्याकडून मला खूप काही शिकायला मिळाले. आपला मुद्दा स्पष्ट करताना ते म्हणाले, संयुक्त राष्ट्र संघात माझे भाषण होणार होते. सुषमाजी माझ्या अगोदर तिथे पोहचल्या होत्या. मी दुसऱ्या देशाचा दौरा करून त्या ठिकाणी पोहचलो, त्या माझे स्वागत करायला आलेल्या होत्या, दुसऱ्या दिवशीच्या माझ्या भाषणाबद्दल आम्ही चर्चा करत होतो, त्यांनी मला विचारले तुम्ही भाषण लिहिले आहे का ? मी म्हणालो, बोलेन, उद्या मला जे वाटतेय ते. त्या म्हणाल्या, "नाही असे होत नाही असे नसते, तुम्ही मला तुमचे विचार सांगा, मी लिहिन, मला आग्रह करून त्यांनी भाषण लिहायला लावले, रात्री आम्ही त्या भाषणाचा ड्राफ्ट तयार केला. सकाळी तो फायनल करून मग मी भाषण केले. त्या म्हणाल्या, तुम्ही खूप चांगले भाषण करता, इथे करालही, पण ज्या ठिकाणी भाषण लिखित हवे, तिथे ते लिखितच हवे. त्या ठिकाणी तडजोड करता कामा नये. मला तो धडा होता. अशा अनेक गोष्टी आहेत. हे सांगतान मोदी यांनी हातवारे करून खरोखर उपस्थितांसमोर त्यावेळचा तो प्रसंगच नेमकेपणाने उभा केला. 

मोदी पुढे म्हणाले, परराष्ट्र मंत्रालयाच्या कामाची दिशाच त्यांनी बदलली, त्या खात्याच्या मानसिकतेमध्ये त्यांनी परिवर्तन घडवले. भारतातला कुठलाही माणूस जगाच्या पाठीवर कुठेही असो त्याला आपल्या देशाच्या दुतावासाची मदत मिळायलाच हवी त्यांनी या खात्याची कार्यपद्धतीच बदलली. जे खाते केवळ प्रोटोकॉलसाठी ओळखलं जाते त्या खात्याला त्यांनी "पीपल्स कॉल' ला प्राधान्य देणारे खाते बनवले. त्यांच्या काळात देशात अ"घ्या पाच वर्षात 505 पासपोर्ट कार्यलये उघडली गेली. मागील 77 वर्षांत देशात अवघी 77 पासपोर्ट कार्यलये होती. मात्र त्यांनी 5 वर्षात इतकी कार्यलये उघडून हे खाते लोकांपर्यंत नेले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com