modi and ram mandir judgment | Sarkarnama

न्यायालयाचा निर्णय हा नवी पहाट आणणारा - नरेंद्र मोदी

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

नवी दिल्ली : राम जन्मभूमी खटल्याचा निकाल हा नवी पहाट निर्माण करणारा आहे तसेच विविधतेतून एकतेचा भारताचा मंत्र अधि उजळून टाकणारा आहे, आजच्या दिवशी नवा इतिहास रचला जाणार आहे असा विश्‍वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. अयोध्या खटल्याचा निकाल लागल्यावर आज संपूर्ण राष्ट्राला संबोधीत करताना मोदी यांनी न्यायाधीशांचे आणि न्यायालयीन यंत्रणेचे कौतुक करून ही घटना देशाच्या इतिहासातील सुवर्ण अध्याय असल्याचे प्रतिपादन केले. 

अयोध्येचा निकाल आज लागला आहे, आजचा दिवस या देशातील नागरिकांनी सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचा दिवस आहे. कायद्याच्या चौकटीत प्रत्येक बाबीचा निकाल लागू शकतो यावरचा विश्‍वास दृढ होण्याचा हा दिवस असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. कुणाच्या मनात या गोष्टीबद्दल जर थोडीफार जरी कटुता असेल तर त्याला तिलांजली द्यावी असे आवाहनही मोदी यांनी यावेळी केले. या निकालाने व त्यावर देशवासियांनी ज्या होकारात्मक पद्धतीने त्याचे स्वागत केले त्यामुळे भारताची लोकशाही व्यवस्था मजबूत असल्याची ग्वाही जगाला दिल्याचे मोदी यांनी सांगितले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख