Modi and Raj Public Meetings in Dindori | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

उन्मेश जोशी यांची ईडीकडून गेल्या पाच तासापासून चौकशी

राज ठाकरेंची सभा नाशिक, दिंडोरीसाठी गेमचेंजर, की मोदी वातावरण बदलणार?

संपत देवगिरे
बुधवार, 17 एप्रिल 2019

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची येत्या २२ एप्रिलला सकाळी दहाला पिंपळगाव बसवंत येथे सभा होणार आहे. या सभेची सर्व प्रशासकीय व पोलिसांची तयारी झाली आहे. मात्र, गोपनीय शाखेने याबाबत सावधगिरीचा इशारा देणारा अहवाल पाठवला आहे. सभेचे ठिकाण पिंपळगाव बसंत हे शेतमालाचे केंद्र आहे. कांदा व अन्य शेतीविषयक आंदोलने येथे वारंवार होत असतात. पंतप्रधानांच्या सभेतही अशा आंदोलनाची शक्‍यता गृह विभागाने गृहीत धरली आहे.

नाशिक : नाशिक, दिंडोरी या मतदारसंघात शेवटच्या टप्प्यात २९ एप्रिलला मतदान होत आहे. त्यासाठी शेवटच्या टप्प्यात नाशिकला पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे उध्दव ठाकरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शरद पवार आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या सभा होत आहेत. मात्र, पंतप्रधान मोदी यांच्या सभेबाबत प्रशासन व भाजप दोघेही चिंतीत तर राज ठाकरेंच्या सभेमुळे कॉंग्रेस आघाडीत उत्साह असे चित्र आहे. त्यामुळे पंतप्रधानांची सभा वातावरण बदलेल, की राज ठाकरे यांची सभा गेमचेंजर ठरते, याची चर्चा आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची येत्या २२ एप्रिलला सकाळी दहाला पिंपळगाव बसवंत येथे सभा होणार आहे. या सभेची सर्व प्रशासकीय व पोलिसांची तयारी झाली आहे. मात्र, गोपनीय शाखेने याबाबत सावधगिरीचा इशारा देणारा अहवाल पाठवला आहे. सभेचे ठिकाण पिंपळगाव बसंत हे शेतमालाचे केंद्र आहे. कांदा व अन्य शेतीविषयक आंदोलने येथे वारंवार होत असतात. पंतप्रधानांच्या सभेतही अशा आंदोलनाची शक्‍यता गृह विभागाने गृहीत धरली आहे. त्यासाठी भाजपचे नेते, तसेच पोलिसांनी पुरेशी खबरदारी घेण्याचे ठरवले आहे. मात्र, चुकून असे आंदोलन झालेच सभेविषयी देशभरात नकारात्मक संदेश जाऊ शकतो. त्यामुळे ठिकाण बदलावे किंवा कसे याविषयी आयोजक काळजीत आहेत.

पंतप्रधानांची सभा झाल्यानंतर २६ एप्रिलला राज ठाकरे यांची सायंकाळी गोल्फ क्‍लब मैदानावर सभा होणार आहे. ठाकरे यांच्या यंदाच्या सभांत पंतप्रधान मोदी व भाजप टिकेचे लक्ष्य राहिले आहे. अशा स्थितीत राज ठाकरे यांना मोदींच्या सभेतील विषयांतील वास्तव काय हे मांडण्याची संधी असेल. त्यांच्या सभा वाहिन्यांसह सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होतात. त्यामुळे भाजप, शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार 'डॅमेज' करु शकतात. ठाकरे प्रत्येक सभेत नवीन मुद्दा मतदारांसमोर मांडतात. शेवटच्या टप्प्यातील सभा असल्याने ते कोणता मुद्दा मांडतील याची उत्सुकता आहे. या सभांमुळे महायुतीत धास्ती तर कॉंग्रेस आघाडीत उत्साह संचारला आहे. त्यामुळे राज ठाकरे यांची सभा यंदाच्या निवडणुकीत नाशिक, दिंडोरीसाठी गेमचेंजर ठरणार का याकडे लक्ष लागले आहे.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांची सभा यशस्वी करण्यासाठी पक्षाचे सर्व पदाधिकारी सज्ज आहेत. आज झालेल्या बैठकीत त्यावर चर्चा झाली. ही सभा लोकसभेसाठी गेमचेंजर ठरेल असा आमचा विश्‍वास आहे. - अॅड. राहुल ढिकले, प्रदेश उपाध्यक्ष, मनसे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख