modi and pune | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

अहमदनगर जिल्ह्यात 5 वाजे पर्यंत 62.86% मतदान
सिंधुदुर्गात सरासरी 60 टक्के मतदान
पिंपरी चिंचवडला सायंकाळी पाच वाजेपर्यंत झाले सरासरी ४८.३७ टक्के मतदान.
बारामतीत संध्याकाळी पाच पर्यंत 64 टक्के मतदानाची नोंद
जालना जिल्हा दुपारी 3-00 पर्यंत 50.29 टक्के मतदान
परभणी जिल्ह्यात दु. ३ पर्यंत 47.53 टक्के मतदान
पनवेल विधानसभा मतदार संघामध्ये दुपारी 3.00 पर्यंत 38.93% मतदान
जळगाव जिल्ह्यात दुपारी 3.00 वाजेपर्यंत 39.96% मतदान
बीड परळी - दुपारी ३ पर्यंत ४७.१८ टक्के मतदान
नाशिकला दुपारी ३ पर्यंत ४५ टक्के मतदान
ठाणे जिल्हा : दुपारी 3.00 वाजेपर्यंत 35.50 टक्के मतदान
हडपसर मतदार संघातून दुपारी तीन वाजेपर्यंत 41.16 टक्के मतदान

पंतप्रधान मोदींची पुण्यातील सभा स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर

उमेश घोंगडे
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

पुणे : भारतीय जनता पक्ष व शिवसेना महायुतीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुण्यातील जाहीर सभा येत्या 17 ऑक्‍टोबरला सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या मैदानावर होणार आहे. महायुतीच्या कोअर कमिटीच्या बैठकीत सभेचे ठिकाण आज निश्‍चित करण्यात आले. एकिकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेसाठी मैदानाचा शोध सुरू असताना भाजपाच्या सभेसाठी मात्र मैदान तातडीने उपलब्ध झाले आहे. 

मोदी यांच्या 17 तारखेला राज्यात तीन सभा होणार आहेत. छत्रपती उदयनराजे भोसले व ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यासाठी अनुकमे सातारा व परळी येथे सभा होणार आहेत. त्यानंतर सायंकाळी साडेपाच वाजता पंतप्रधान मोदी पुण्यातील सभेसाठी येणार आहेत. 2014 च्या लोकसभा निवडणुकीसाठी पुण्यात याच महाविद्यालयाच्या मैदानावर मोदींची सभा झाली होती. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मोदी यांची पुण्यात सभा झाली नव्हती. पुणे शहरात भाजपाचे आठ आमदार आहेत. शिवाय जिल्ह्यातही गेल्या निवडणुकीत नऊ आमदार निवडून आले होते. या पार्श्‍वभूमीवर शहर व जिल्ह्यासाठी पुण्या ही सभा घेण्यात आली आहे. 

मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या सभेला जागा मिळत नाही. या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान मोदी यांच्या सभेला कोणती जागा निवडण्यात येते याकडे लक्ष लागले होते. पंतप्रधान मोदी यांच्या सभेला होणारी गर्दी लक्षात घेऊन स. प. महाविद्यालयाची जागा निश्‍चित करण्यात आल्याचे शहर भाजपाच्यावतीने सांगण्यात आले. 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख