modi and nagpur metro | Sarkarnama

संत्र्याप्रमाणे नागपूर मेट्रो जगप्रसिद्ध होईल - नरेंद्र मोदी

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 7 मार्च 2019

नागपूर : मेट्रो केवळ आधुनिक सुविधा नसून संपूर्ण वाहतुकीचे क्षेत्र त्यामुळे सुलभ होणार आहे. मेट्रोचे जाळे विस्तारण्यासाठी केंद्र सरकारने धोरण तयार केले. त्या धोरणामुळेच देशभरात मेट्रोची कामे वेगाने होत आहेत. 2050 पर्यंत नागपूरची लोकसंख्या दुप्पट होणार असून अशावेळी नागरिकांना सहज प्रवासासाठी केंद्र व राज्य सरकार काम करीत आहे. नागपुरी संत्र्याप्रमाणे नागपूर मेट्रोही जगप्रसिद्ध होईल, असा विश्‍वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केला. 

नागपूर : मेट्रो केवळ आधुनिक सुविधा नसून संपूर्ण वाहतुकीचे क्षेत्र त्यामुळे सुलभ होणार आहे. मेट्रोचे जाळे विस्तारण्यासाठी केंद्र सरकारने धोरण तयार केले. त्या धोरणामुळेच देशभरात मेट्रोची कामे वेगाने होत आहेत. 2050 पर्यंत नागपूरची लोकसंख्या दुप्पट होणार असून अशावेळी नागरिकांना सहज प्रवासासाठी केंद्र व राज्य सरकार काम करीत आहे. नागपुरी संत्र्याप्रमाणे नागपूर मेट्रोही जगप्रसिद्ध होईल, असा विश्‍वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केला. 

राजधानी दिल्लीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे नागपूर मेट्रोला हिरवी झेंडी दाखविली अन्‌ संत्रानगरीच्या इतिहासात आणखी एका सुवर्ण अध्यायाची नोंद झाली. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार, जि. प. अध्यक्ष निशा सावरकर, खासदार कृपाल तुमाने, खासदार डॉ. विकास महात्मे, केंद्रीय गृहनिर्माण व शहर विकास मंत्रालयाचे सचिव व महामेट्रोचे अध्यक्ष दुर्गाशंकर मिश्र, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रजेश दीक्षित यांच्यासह सर्व आमदार, मेट्रोचे अधिकारी उपस्थित होते. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीप्रमाणे मराठीतून भाषणाला सुरुवात केली. पुढे ते म्हणाले, मेट्रोमुळे खापरी ते सीताबर्डीपर्यंतच्या मार्गावर आमूलाग्र बदल होईल. देशातील सर्वांत पर्यावरणपूरक मेट्रो असून नागरिकांना सुविधा, सुरक्षेसह प्रदूषणमुक्त प्रवास शक्‍य होईल. आतापर्यंत या मेट्रोमुळे 20 हजार रोजगार मिळाला असून पुढेही त्यात वाढ होईल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. मेट्रोमुळे शहराचा विस्तार होऊन उत्पन्नाचे नवे स्त्रोत निर्माण होतात. 2014 पर्यंत केवळ 240 किमीचे मेट्रोच्या जाळ्यात गेल्या पाच वर्षांत 400 किमीने भर टाकली. हे केवळ मागील मजबूर सरकार हटवून नवी मजबूत सरकार निवडल्यामुळेच शक्‍य झाल्याचे नमूद करीत त्यांनी मागील सरकारवर ताशेरेही ओढले. आता "एक देश, एक कार्ड'चा प्रयत्न सुरू असून देशातील कुठल्याही वाहतूक सेवेचा लाभ घेता येईलच, शिवाय ऑनलाइन पेमेंटसाठीही त्याचा वापर करता येईल. हे तंत्रज्ञान अस्सल भारतीय असून विदेशी तंत्रज्ञान आयात करण्याची सवय मोडीत काढल्याचे स्पष्ट केले. 

पुढील पंतप्रधानही मोदीच ! 
आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण होत आहे. परंतु, पुढील टप्प्याचे कामाच्या लोकार्पणासाठी तुम्हीच यावे, असे आमंत्रण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिले. यावर पंतप्रधानांनी आपल्या भाषणातून मे-जूनपर्यंत कामे पूर्ण करा, मी लोकार्पणाला येणार, अशी ग्वाही देत पुढील पंतप्रधानही तेच राहणार असल्याचे संकेत दिले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख