मराठवाड्याने कॉंग्रेसला तीन मुख्यमंत्री देऊनही विकास का झाला नाही ? - नरेंद्र मोदी

मराठवाड्याने कॉंग्रेसला तीन मुख्यमंत्री देऊनही विकास का झाला नाही ? - नरेंद्र मोदी

परतूर : मराठवाड्याने आतापर्यंत राज्याला तीन मुख्यमंत्री दिले, तरी या भागाचा विकास का होऊ शकला नाही ? त्यांच्या तीन मुख्यमंत्र्यांची कामगिरी एकीकडे आणि भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांची कामगिरी याची तुलना केली तर भाजपचा मुख्यमंत्रीच सरस ठरेल अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादीवर टिका करतांनाच फडणवीसांचे कौतुकही केले. भाजप-शिवसेना महायुतीचे परतूर मतदारसंघाचे उमेदवार पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान मोदी यांच्या जाहीर सभेचे परतूर येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची उपस्थिती होती. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना मोदींनी कॉंग्रेस-राष्ट्रवादीवर टीकेची झोड उठवली. 

मोदी म्हणाले, कॉंग्रेस-राष्ट्रवादीने महाराष्ट्रात प्रत्येक कामात भागीदारी केली. त्यांच्या नियतीत खोट असल्यामुळे मराठवाड्यातील जनतेसाठी आणलेल्या अनेक योजना या लोकापर्यंत न पोचता त्यांच्या कुटुंबियापर्यंतच मर्यादित राहिल्या. मराठवाड्याने आतापर्यंत महाराष्ट्राला तीन मुख्यमंत्री दिले, पण तरीही मराठवाड्याचा विकास होऊ शकला शकला नाही. रस्ते, पाणी, आरोग्या सारख्या मुलभूत सुविधांसाठी इथल्या लोकांना तडफडावे लागतं हे दुर्दैवी आहे. कॉंग्रेसच्या तीन आणि भाजपच्या एका मुख्यमंत्र्याची तुलना केली तर आमचे मुख्यमंत्रीच सर ठरतील असे सांगत मोदींनी फडणवीसांच्या कामाचे कौतुक केले. 

महाराष्ट्र हे छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा फुलेंसारख्या वीरांची भूमी आहे. या महाराष्ट्रातील महापुरूषांनी देशाला दिशा देण्याचे काम वर्षानुवर्षे केले आहे. राष्ट्रवाद आणि राष्ट्रभावनेचा आवाज या महाराष्ट्राच्या मातीतून बुलंद झाला. पण कॉंग्रेस - राष्ट्रवादीच्या लोकांना हे समजत नाही आणि ते या संस्कारांना ठेच पोचवतात. सर्जिकल स्टाईक आणि बालाकोट हल्यासह काश्‍मीरच्या 370 कलमाबाबत विरोधकांनी घेतलेल्या नकारात्मक भूमिकेवर हल्ला चढवतांना मोदी म्हणाले, राष्ट्रहितासाठी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे, जगाला एकच आवाज ऐकू गेला पाहिजे, परंतु कॉंग्रेस-राष्ट्रवादी यात राजकारण करत असते. राष्ट्रवादाची भाषा त्यांना समजत नाहीये, यावरून विरोधी पक्षात काय सुरु आहे हे लक्षात येते असा टोला देखील मोदींनी यावेळी लगावला. वॉटर ग्रीडच्या माध्यमातून पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमचा दूर होणार आहे असे सांगतानाच जालन्यात ड्रायपोर्ट, सिडपार्क, आयसीटी सारख्या संस्था आणि प्रकल्पातून रोजगार निर्मिती होऊन विकासाला चालना मिळणार असल्याचेही मोदी म्हणाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com