" भारत की मन की बात मोदीजी के साथ ' रथाचा शुभारंभ

" भारत की मन की बात मोदीजी के साथ ' रथाचा शुभारंभ

औरंगाबाद : आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेशी युती झाली नाही तर स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची जय्यत तयारी भाजपने सुरू केली आहे. यासाठी बुथस्तरावर अनेक मोहिमा हाती घेण्यात आल्या असून " भारत की मन की बात मोदीजी के साथ' या घोषवाक्‍यासह तयार करण्यात आलेला विशेष रथ गावावातून फिरवण्यात येणार आहे. रथावर लावण्यात आलेल्या भव्य स्क्रीनच्याद्वारे केंद्र आणि राज्य सरकारने सर्वसामान्यांसाठी राबवलेल्या योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहचवण्यात येणार आहे. 

हा विशेष रथ पाच फेब्रुवारीपासून औरंगाबाद जिल्ह्यात दाखल झाला असून मंगळवारी (ता.12) बजाजनगरात भाजप शहर उपाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड यांच्या हस्ते या रथाचे शुभारंभ करण्यात आला. रथाच्या माध्यमातून भाजपने आपल्या स्वंतत्र प्रचाराला सुरूवात केल्याचे स्पष्ट होते. या रथाच्या माध्यमातून योजनांमधील त्रुटी, नागरिकांच्या भावनांचा ठाव घेण्याचा प्रयत्न देखील केला जाणार आहे. 

मुंबईत पाच फेब्रुवारीला महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या उपक्रमास सुरूवात झाली होती. प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्र रथ उपलब्ध करून देण्यात आला आहे. गेल्या आठवड्याभरापासून हा रथ जिल्ह्यातील ग्रामीण भागात भाजपचे जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वैजापूर विधानसभा मतदारसंघात फिरवण्यात आला होता. 

आता तो गंगापुर तालुक्‍यात तसेच औरंगाबाद पश्‍चिम मतदार संघातील काही गावात दाखल झाला आहे. बजाजनगरात मंगळवारी सरकारी योजनाची माहिती देत असतांनाच नागरिकांच्या सूचनांची दखल देखील घेण्यात येत होती. अंत्योदय योजना शेवटच्या घटका पर्यंत पोहचविण्याचा या रथाच्या माध्यातून प्रयत्न होत आहे. प्रत्येक मतदारसंघातून नागरिकांचा कल या माध्यमातून घेतला जात आहे. 

आचारसंहिता जाहीर होईपर्यंत फिरणार रथ 
वैजापूर जिल्ह्यातून निघालेला हा रथ, गंगापूर आणि पश्‍चिम विधानसभा मतदारसंघात दाखल झाला आहे. प्रत्येक मतदारसंघात किमान तीन दिवस हा रथ फिरवण्यात येणार आहे. आठवडी बाजारासह गर्दीची ठिकाणे निवडत सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न या निमित्ताने केला जातोय. सर्वसामान्यांकडून भौतिक सुविधा इतर समस्याविषयी सुचनाही घेतल्या जात आहेत. बुथनिहाय संघटन मजबूत करतांनाच रथाच्या माध्यमातून मतदाराचे मत परिवर्तन करत पुन्हा एकदा मोदी सरकार आणण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होईपर्यंत हा रथ मतदारसंघात फिरवण्यात येणार असल्याचे भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com