modi to address rally in pune on 17 th October | Sarkarnama

पंतप्रधान नरेंद्र मोदींची पुण्यातील सभा 17 आॅक्टोबरला

उमेश घोंगडे 
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवडणुकीच्या प्रचारात राज्यात नऊ सभा होणार आहेत. यातील एक सभा पुण्यात 17 ऑक्‍टोबरला सायंकाळी होणार आहे. मात्र, सभेचे ठिकाण अद्याप ठरलेले नाही. सभेच्या जागेबाबत बाहणी करण्यात येत असून बहुधा आज रात्री पक्षाच्या पुण्यातील कोअर कमिटीच्या बैठकीत सभेचे ठिकाण निश्‍चित होण्याची शक्‍यता आहे.

13 ते 18 ऑक्‍टोबर दरम्यान पंतप्रधान मोदी यांच्या राज्यात नऊ सभा होणार आहेत. 13 ऑक्‍टोबरला जळगाव व सोकोली.16 ऑक्‍टोबरला मुबंईत ऐरोली, अकोला तसेच परतूर येथे सभा होणार आहेत. 17 ऑक्‍टोबरला परळी, पुणे व सातारा येथे सभा होणार आहेत. 18 ऑक्‍टोबरला मंबुईत समारोपाची सभा होणार आहे. मात्र, या जागेचे ठिकाणदेखील अद्याप निश्‍चित व्हायचे आहे.

साताऱ्यात 17 ऑक्‍टोबरला सकाळी सभा होणार आहे. छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यासाठी ही जाहीर सभा होणार असून आमदार शिवेंद्रराजे यांच्यासह महायुतीच्या जिल्ह्यातील सर्वच उमेदवारांना या सभेचा फायदा होणार आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या पुण्यातल्या सभेकडे लक्ष लागले आहे. या सभेच्या ठिकाणाबाबत उत्सुकता आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीवेळी पुण्यात पंतप्रधान मोदी यांची सभा झाली नव्हती. गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या मैदानावर जंगी सभा झाली होती. या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान मोदी यांची सभा पुण्यात कोणत्या मैदानावर होणार याबाबत कमालीची उत्सुकता आहे.
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख